जिल्ह्यातील रेतीमाफीयांवर आवर घाला, अन्यथा आंदोलन**मानवाधिकार पार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

*जिल्ह्यातील रेतीमाफीयांवर आवर घाला, अन्यथा आंदोलन*

*मानवाधिकार पार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

अतुल कोल्हे भद्रावती :-
              जिल्ह्यात रेती घाट बंद असताना सुद्धा भद्रावती तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात रेती माफियाद्वारे मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी होत आहे. या रेती माफियांवर पंधरा दिवसात कारवाई करून त्यांच्यावर आवर घालावा अन्यथा मानवाधिकार पार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा मानवाधिकार पार्टीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या एका निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी मानवाधिकार पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करून त्यांना जिल्ह्यात होत असलेल्या रेती तस्करीची सविस्तर माहिती दिली.या तस्करीमुळे शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडत असल्याचे मानवाधिकार पार्टीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देण्यात आले. यावेळी रेतीमाफीयांवर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यां तर्फे देण्यात आले. निवेदन सादर करताना मानवाधिकार पार्टीचे राष्ट्रीय प्रभारी तपन राय, विदर्भ अध्यक्ष डॉक्टर विश्वजीत मुखर्जी, महिला जिल्हा अध्यक्ष रिमा सरकार, पुष्पा सरकार आदी उपस्थित होते.

Comments