जाचक नियमांविरोधात वरोऱ्यात कृषी विक्री केंद्रांचा बेमुदत बंद; खरीप हंगामावर संकटाची छाया.

जाचक नियमांविरोधात वरोऱ्यात कृषी विक्री केंद्रांचा बेमुदत बंद; खरीप हंगामावर संकटाची छाया. स्थानिक अधिकाऱ्याकडून विनाकारण त्रास ? वरोरा, (प्रतिनिधी) : राज्य सरकारकडून कृषी निविष्ठा (खते, बियाणे, कीटकनाशके) विक्रेत्यांवर लादण्यात आलेल्या जाचक अटी व नियमांच्या निषेधार्थ राज्यभरातील कृषी आस्थापनांनी २७ एप्रिल २०२६ पासून बेमुदत संप पुकारला आहे. महाराष्ट्र फर्टिलायझर्स डीलर्स असोसिएशन च्या आवाहनाला प्रतिसाद देत वरोरा तालुका अॅग्रो डीलर्स असोसिएशननेही १०० टक्के बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कृषी विभागाच्या त्रासदायक कारवाया आणि कठोर नियमांमुळे विक्रेते मेटाकुटीस आले असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. रासायनिक खत कंपन्यांकडून केली जाणारी सक्तीची ‘लिंकिंग’ पद्धत, अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्यांची विक्री, तसेच ‘साथी’ मोबाइल अॅपद्वारेच बियाणे विक्रीची सक्ती याला तीव्र विरोध दर्शवण्यात आला आहे. याशिवाय, सीलबंद कीटकनाशके विकल्यानंतरही विक्रेत्यांवर होणारी दंडात्मक कारवाई आणि...

*बेलोरा कोळसा खाणीत स्थानिक बेरोजगारांना रोजगार द्या**मानवाधिकार पार्टीचे अरबिंदो कंपनीला निवेदन*

*बेलोरा कोळसा खाणीत स्थानिक बेरोजगारांना रोजगार द्या*

*मानवाधिकार पार्टीचे अरबिंदो कंपनीला निवेदन*
 
अतुल कोल्हे भद्रावती :-
                अरबिंदो  रियालिटी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडून तालुक्यातील बेलोरा- जेना परिसरात कोळसाखान सुरू करण्यात आली आहे. या कंपनीत 70% स्थानिकांना रोजगार देण्यात यावा यासाठी मानवाधिकार पार्टीचे विदर्भ अध्यक्ष डॉक्टर बिश्वास मुखर्जी यांनी एका शिष्टमंडळासह अरबिंदो  कंपनी व्यवस्थापनाशी प्रत्यक्ष चर्चा केली व कंपनीत स्थानिक बेरोजगारांनाच  रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावर जसजसा खाणीचा विस्तार होत जाईल तसतसा कंपनीत स्थानिक बेरोजगारांनाच रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन सदर कंपनीतर्फे देण्यात आले. यावेळी मानवाधिकार पार्टीच्या वतीने डॉक्टर विश्वास मुखर्जी यांच्या नेतृत्वात कंपनीला याविषयी एक निवेदन सादर करण्यात आले.अरबिंदो  कंपनीतर्फे तालुक्यातील बेलोरा, टाकळी, जेना, पानवडाळा आदी  परिसरात कोळसाखान सुरू करण्यात आली असून खाणीच्या विस्तारासाठी कंपनीतर्फे या परिसरातील शेतजमीन अधिग्रहण करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याने या परिसरातील बेरोजगारांच्या रोजगाराविषयक अशा पल्लवीत झाल्या आहे. सदर चर्चेला पार्टीचे राष्ट्रीय प्रभारी तपन राय, विदर्भ अध्यक्ष डॉक्टर बिस्वास मुखर्जी जय आंडी, श्री फाले आदी उपस्थित होते.

Comments