जाचक नियमांविरोधात वरोऱ्यात कृषी विक्री केंद्रांचा बेमुदत बंद; खरीप हंगामावर संकटाची छाया.

जाचक नियमांविरोधात वरोऱ्यात कृषी विक्री केंद्रांचा बेमुदत बंद; खरीप हंगामावर संकटाची छाया.

स्थानिक अधिकाऱ्याकडून विनाकारण त्रास ?

वरोरा, (प्रतिनिधी) : राज्य सरकारकडून कृषी निविष्ठा (खते, बियाणे, कीटकनाशके) विक्रेत्यांवर लादण्यात आलेल्या जाचक अटी व नियमांच्या निषेधार्थ राज्यभरातील कृषी आस्थापनांनी २७ एप्रिल २०२६ पासून बेमुदत संप पुकारला आहे. महाराष्ट्र फर्टिलायझर्स डीलर्स असोसिएशन च्या आवाहनाला प्रतिसाद देत वरोरा तालुका अॅग्रो डीलर्स असोसिएशननेही १०० टक्के बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
कृषी विभागाच्या त्रासदायक कारवाया आणि कठोर नियमांमुळे विक्रेते मेटाकुटीस आले असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. रासायनिक खत कंपन्यांकडून केली जाणारी सक्तीची ‘लिंकिंग’ पद्धत, अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्यांची विक्री, तसेच ‘साथी’ मोबाइल अॅपद्वारेच बियाणे विक्रीची सक्ती याला तीव्र विरोध दर्शवण्यात आला आहे. याशिवाय, सीलबंद कीटकनाशके विकल्यानंतरही विक्रेत्यांवर होणारी दंडात्मक कारवाई आणि स्थानिक अधिकाऱ्यांकडून होणारा त्रास हेही आंदोलनाचे प्रमुख मुद्दे आहेत.
दरम्यान, या संदर्भात वरोरा येथील पदाधिकाऱ्यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. अनधिकृत एजंटमार्फत होणारी बेकायदेशीर खतविक्री रोखावी आणि विक्रेत्यांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
वरोरा तालुका असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र देठे, उपाध्यक्ष देवानंद महाजन आणि सचिव आनंद गुंडावार, आशिष टोंगे यांनी सर्व सदस्यांना संपात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या बेमुदत बंदमुळे खरीप हंगामातील पेरणीसाठी आवश्यक निविष्ठांचा पुरवठा खंडित होण्याची शक्यता असून, कृषी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
.      Happy Birthday Manojbhau kohale


Comments