*संस्कार बाळेकरमकर तालुक्यातून प्रथम*. यशाच्या आड परिस्थिती येत नाही**सागर सातपूते याने स्थानिक पत्रकारांजवळ उघडले यशाचे रहस्य*

*संस्कार बाळेकरमकर तालुक्यातून प्रथम*

अतुल कोल्हे भद्रावती :-
                 नुकताच दहावी राज्य बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून भद्रावती येथील संस्कार बाळेकरमकर हा दहावी शालांत परीक्षेत 94.80% गुण घेत  तालुक्यात अव्वल ठरला आहे. संस्कार विनोद बाळेकरमकर याने 94.80% गुण घेत तालुक्यात प्रथम स्थान प्राप्त केले. संस्कार हा सेंट अंनेस कॉन्व्हेन्ट चा विद्यार्थी आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य, शिक्षक वृंद व आपल्या आई - वडीलांना दिले आहे. सर्व स्तरातून संस्कार वर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

-----------------------------------------------------------------

*यशाच्या आड परिस्थिती येत नाही*

*सागर सातपूते याने स्थानिक पत्रकारांजवळ उघडले यशाचे रहस्य*

*सत्कार करताना कर्मवीर विद्यालय गवराळा चे मुख्याध्यापक व शिक्षक*

           घरातील परिस्थिती कशी असली तरी मेहणत, जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाने कोणतेही काम पूर्ण केले तर परिस्थिती आड येत नाही. असे विपरीत परिस्थितीत दहावीत ९३.२० टक्के गुण प्राप्त केलेला चिरादेवी येथील विद्यार्थी सागर विलास सातपुते याने स्थानिक पत्रकारांशी आपल्या यशाचे रहस्य उघड केले.
     
         गवराळा येथील कर्मवीर विद्यालयातून प्रथम आलेला विद्यार्थी सागर सातपुते म्हणाला, नियमित शाळेतील अभ्यास हा ८० टक्के होतो तर २० टक्के अभ्यासाची तयारी स्वतः ला करावी लागते. अभ्यासात सातत्य बाळगले व नियमित ४ ते ५ तास अभ्यास केल्यास यश संपादन करता येते.

       सागर पुढे म्हणाला, घरची परिस्थिती हलाखीची होती. वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत. शेतकऱ्यांच्या नशीबी अठराविश्व दारिद्र्य पुंजलेलंच आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी नापिकी यामुळे घरात सतत अडचण असायची. परंतु परिस्थितीचा बाहू करत बसलो नाही तर परिस्थिती माझ्या स्ट्रेंथ बनला होता. 

      परीक्षेदरम्यान ५ ते ६  तास अभ्यास गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी आवश्यक ठरला. यामध्ये अडचण आली तर शिक्षकाचे वेळोवेळी मार्गदर्शन मोलाची भूमिका बजावते. मनात दृढ विश्वास व जिद्द बाळगली तर यशाचे गमक कोणीही रोखू शकत नाही. यासाठी आत्मविश्वास महत्वाचा ठरतो. ध्येय निश्चित करून मार्गक्रमण केल्यास मग यशाची पायरी गाठणे सहज शक्य आहे. सागरला प्रशासकीय क्षेत्रात जाण्याची आवड असून क्लास वन अधिकारी व्हायचे आहे. यासाठी त्याने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. यावर त्याचे वडील विलास सातपुते म्हणाले, माझी परिस्थिती हलाखीची असली तरी मुलाच्या शिक्षणासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी आहे. 
    
         त्याच्या या यशाचे भागीदार आई - वडील, कर्मवीर विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. डी. डी. दोहतरे सर,  वैद्य सर, मुसळे सर व विद्यालयातील संपूर्ण शिक्षक वृंद व मंगेश उपरे असल्याचे तो म्हणाला..

*सागर ने  दिला यशाचा मूलमंत्र*

* संकोच न बाळगता ध्येयाला सामोरे जावे. 
* ध्येयाप्रती समर्पित भावना असावी. 
* शालेय अभ्यासक्रमात सोबतच वैयक्तिक अभ्यासावर भर द्यावा.
* पेपरचा सराव करावा. 
* अभ्यासाचे नियोजन करावे. 
* स्वत:तील क्षमता सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करावे.
*******************************************

Comments