गुरुजी महेश गजभे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

गुरुजी महेश गजभे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 


वरोरा
चेतन लुतडे 

महेश गजबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा या आशयाची अभिनंदन पर मेसेजेस गुरुजींना धडकल्याने गुरुजींचे मनोबल वाढले असून आपल्या जीवनात आपण काहीतरी सार्थक काम केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. 

मूळचे राहणार वरोरा येथील शिक्षक महेश गजभे सध्या अर्जुनी मोरगाव येथील पंढरी भाऊ देशमुख विद्यालय एरंडी, महागाव शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मागील 18 वर्षापासून या गावात शिक्षक म्हणून कार्य करत असताना ग्रामीण भागातील मुलांवर प्रचंड प्रेम आणि आपुलकीच्या भावनांनी शिकवणारे महेश गुरुजी त्यांच्या अष्टपैलू व्यक्तित्वामुळे या ठिकाणी परिचित आहे.  वाढदिवसानिमित्त मित्रांकडून त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी जमलेल्या मित्रांनी शुभेच्छा देत विद्यार्थ्यांकडून आपुलकीचे मेसेज आल्याने गुरुजी चे मन हेलावले होते. 
अर्धा आयुष्य निघाल्यानंतर पुढील आयुष्यात नवीन काहीतरी करण्याची इच्छा त्यांच्यामध्ये जागृत आहे. त्यामुळे आपल्याच शिक्षकी पेशात ग्रामीण भागातील मुलांना पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली.

वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल मित्रपरिवारांचे आभार त्यांनी व्यक्त केले आहे.

********************************************

Comments