आयपीएलवर क्रिकेट सट्टा खेळणाऱ्या 30 सट्टेबाजा वर गुन्हे दाखल.

आयपीएलवर क्रिकेट सट्टा खेळणाऱ्या  30  सट्टेबाजा वर  गुन्हे दाखल. 

जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई. सट्टेबाजांचे जाळे उध्वस्त. 

ओमप्रकाश जाधव , मिनाज, जम्मू, पिंटू तडस यांच्यासह 30 फंटरवर  गुन्हे दाखल.


वरोरा 
चेतन लुतडे 

दि.१२/०५/२४ रोजी आय.पी.एल. मॅचवर बेटींग करून, हार-जीतचा जुगार खेळणारे आरोपी विरूध्द कारवाई करणेकरीता, सहाय्यक पोलीस अधीक्षक ,उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम  यांनी, गोपनीय बातमीदारांकडुन मिळालेल्या माहीतीच्या आधारे, पो.स्टे. वरोरा येथील स.पो.नि. विनोद जांभळे, व पोलीस स्टाफसह, श्री. गुघाने यांचे घरी, बावने ले आउट, साई मंगल कार्यालयाच्या बाजुला, वरोरा येथे आय.पी.एल. वर सटट्टा खेळणारे आरोपीवर रेड केली असता, एक खोली मध्ये 
१) ओमप्रकाश देविदास जाधव,
२) आशिष गजानन जाधव, रा. वरोरा हे लॅपटॉप व मोबाईलच्या साहयाने, चिन्नस्वामी स्टेडीयम, बेंगलोर येथील ग्राउंडवर, चालु असलेल्या दिल्ली कॅपिटल विरूध्द रॉयल बॅलेन्जर्स बेंगलोर या इंडीयन प्रिमीयर लिगच्या (आय.पी.एल.) लाईव्ह मॅचवर, पैशाची बाजी लावुन, व मोबाईलवरून, ग्राहकांकडुन मॅचचे सौदे घेउन, हारजितचा जुगार खेळ खेळीत (सटट्टा लावतांना) असतांना मिळुन आले. वरून घटनास्थळावरून १० मोबाईल, ०१ लॅपटॉप, ०१ पेन ड्राईव्ह, ०२ कॅलक्युलेटर, एक अॅक्टीवा मोपेड, व इतर साहीत्य तसेच नगदी रक्कम ३२,७४० रू. असा एकुन ०२,६७,४१० रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 
आरोपी नावे १) ओमप्रकाश देविदास जाधव, वय-४३वर्ष, २) आशिष गजानन जाधव, वय-२७ वर्ष दोन्ही रा. सुभाष वार्ड, आशिर्वाद मंगल कार्यालय वरोरा, पाहीजे आरोपी ३) मिनाज शेख रा.वणी जि. यवतमाळ ४) जम्मु शेख रा.वणी जि.यवतमाळ ५) रितीक जाधव रा. वरोरा. ६) अमोल डांगरे रा. वरोरा ७) अमोल टिपले रा. वरोरा ८) ब.लाखा रा. वरोरा ९) भुषण दिक्षीत रा. वरोरा १०) डॉ. काळे रा. वरोरा ११) अजिंक्य नरडे रा. वरोरा १२) अमित घोडमारे रा. वरोरा १३) समीर पाटील रा. वरोरा १४) सुरज रा. बुटीबोरी नागपुर. १५) राजेश तुपकर रा. वरोरा १६) रवि गभणे रा.वरोरा १७) राहुल टिपले रा. वरोरा १८) पिंन्दु तडस रा. वरोरा १९) पिंन्दु टोंगे रा. वरोरा २०) प्रसाद खडसान रा. वरोरा २१) कुणाल चिमुरकर रा. वरोरा २२) मोहीत शर्मा रा.वरोरा २३) अनिल पाटील रा. वरोरा २४) पंकज वैद्य रा. वरोरा २५) अमित भगत रा. वरोरा २६) गौरव रा. वरोरा २७) रणजित रा. वरोरा २८) अतुल वानखेडे रा. वरोरा २९) मंगेश रा. भद्रावती ३०) मंगेश रा. वरोरा यांचे विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला असुन, पुढील तपास सपोनि विनोद जांभळे पोस्टे वरोरा हे करत आहेत.
सदर कारवाई श्री. मुमक्का सुदर्शन, पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, श्रीमती. रिना जनबंधु, अप्पर पोलीस अधिक्षक, चंद्रपुर. यांचे मार्गदर्शनाखाली, श्रीमती. नयोमी साटम, सहायक पोलीस अधिक्षक, उपविभाग वरोरा, सपोनि विनोद जांभळे, पो. अं. दिपक दुधे, दिपक मेश्राम, रिषभ काटकर, जितेंद्र राजुरकर, मोहन निषाद, राजु लोधी, विशाल राजुरकर, प्रशांत बावणे, चालक हेपट यांनी केली आहे.

या कारवाईमुळे वरोरा शहरात क्रिकेट सट्ट्यावर बराच आळा बसला असून उपविभागीय पोलीस अधिकारी व त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन करण्यात आले आहे.
-------------------------------------------------------------------

Comments