आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा काँग्रेस महिला कार्यकर्त्यांनी केला निषेध.

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा काँग्रेस महिला कार्यकर्त्यांनी केला निषेध. 

वरोरा 
चेतन लुतडे 

लोकसभेच्या रणधुमाळीत चंद्रपूर-वनी- आर्णी लोकसभा क्षेत्रात पंतप्रधान मोदी यांची सभा चंद्रपूर जिल्ह्यातील मोरवा 8 एप्रिल ला घेण्यात आली होती. यादरम्यान चंद्रपूर -वणी -आर्णी लोकसभेचे भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर टीका करत बहिण भावाच्या नात्याचा अश्लील प्रसंग सांगून काँग्रेसला लोकशाही बद्दल बोलण्याचा अधिकार नाही असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे स्थानिक काँग्रेस नेते यांनी या वक्तव्याचा निषेध नोंदविला आहे.

या वक्तव्यानंतर लोकसभेचे काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या पदाधिकारी प्रतिमा जोगी यांनी महिला कार्यकर्त्यांसह वरोरा येथील उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे यांच्याजवळ तक्रार दाखल केली असून काँग्रेस महिला कार्यकर्त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांचा निषेध नोंदवत घोषणाबाजी केल्या. 

या वक्तव्यानंतर लोकसभेतील वातावरण तापले असून काँग्रेस महिला पदाधिकाऱ्यांनी मुनगंटीवार यांना बहीण नाही का? असा सवाल उपस्थित केला आहे. सुधीर मुनगंटीवार हे गेल्या 30 वर्षापासून आपल्या जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी पालकमंत्री  ,अर्थमंत्री सांस्कृतिक व वने मंत्री म्हणून कार्य केलेले आहे. त्यांनी महिला बद्दल अशा पद्धतीचे बोलणे योग्य नाही. काँग्रेस कार्यकर्ते म्हणून आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याची क्लिप सोशल मीडियावर टाकने सुद्धा आम्हाला उचित वाटत नाही. असे मत काँग्रेसचे वरिष्ठ नेता विलास टिपले यांनी व्यक्त केले. चंद्रपूर -वनी -आर्णी क्षेत्रातील महिला मतदार या वक्तव्याचा निषेध करीत आहे. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करताना या महिला बदला घेतील. असा विश्वास राजू महाजन यांनी व्यक्त केला आहे.
आमदार सुधीर  मुनगंटीवार यांच्या भाषणानंतर अर्धवट वायरल झालेल्या भाषणाची क्लिप चंद्रपूर -वनी -आर्णी क्षेत्रातील गाव खेड्यांमध्ये  ही चर्चा रंगू लागली आहे. भाजप कार्यकर्ते आणि काँग्रेस कार्यकर्ते आपापल्या परीने गुणदोष शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र या व्यतिरिक्त चौकस भूमिका असणारे सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, शिक्षक, महिला कर्मचारी, ही भाषा लोकसभेच्या उमेदवाराला आपल्या जनतेपुढे मांडणे योग्य नाही असाच कल सर्वाकडून येत आहे. या एका वाक्याचा फटका लोकसभेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.