कोची येथे इंग्रजी विषयाची कार्यशाळा : शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

*कोची येथे इंग्रजी विषयाची कार्यशाळा : शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद* 

अतुल कोल्हे भद्रावती :-
              तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कोची येथे नुकतीच इंग्रजी विषयाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली.याप्रसंगी शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.यानिमित्य आयोजित उद्घाटनपर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शा. व्य. स. उपाध्यक्षा प्रिती उपरे यांच्यासह प्रमुख अतिथी  गटशिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश महाकाळकर, केंद्र प्रमुख भारत गायकवाड व अंगणवाडी सेविका शालिनी जगताप प्रामुख्याने उपस्थित होत्या.
     या कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून गजानन बोढे यांनी सहभाग घेतला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख भारत गायकवाड यांनी केले.
गट शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश  महाकाळकर  यांनी मार्गदर्शन करतांना म्हटले की,आपल्या तालुक्यातील सर्वच शिक्षक एकदम एकजुटीने कार्य करीत असून हाच उत्साह मुलांच्या प्रगतीसाठी सार्थकी लागेल. डॉ. महाकाळकर यांनी  अभंगातून उपस्थित शिक्षकांना अध्यापनाचे महत्व पटवून सांगितले, आपण केलेले कार्यच आपल्या यशाची प्रचिती देत असते, कोमल कळ्याना फुलवण्याच उत्तम कार्य करा .असा संदेश त्यांनी यावेळी देऊन इंग्रजी विषयाबद्दल मुलांच्या मनात आवड निर्माण करण्याचा मानस यावेळी बोलून दाखवला.
               याप्रसंगी मागील वर्षी तालुक्यातून एकमेव नवोदयला लागलेला ढोरवासा केंद्राचा विद्यार्थी  स्पंदन श्रीमंत मानकर याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Comments