उबाठा गटाच्या शहर संघटिका अलकाताई पचारे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

उबाठा गटाच्या शहर संघटिका अलकाताई पचारे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश


वरोरा
चेतन लुतडे 

वरोरा -आर्णी  लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ भव्य मेळाव्याचे आयोजन व कार्यकर्त्यांची बैठक दिनांक 3 एप्रिल रोज बुधवार  ला चंद्रपूर जिल्हा शिवसेनेतर्फे करण्यात आले होते.
 सदर मेळाव्यात  शिवसेना सचिव व प्रवक्त्या माननीय आमदार डॉक्टर मनीषाताई कायंदे , चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख श्री किशोर जी राय, जिल्हा प्रमुख नितीन मत्ते यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ऊबाठा गटाच्या शहर संघटिका  अलकाताई पचारे  यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतला .
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पूर्व विदर्भाचे समन्वय किरण पांडव  यांच्या कार्याला प्रेरित होऊन जिल्ह्यातील नेतृत्वाला बळकट करण्यासाठी अलकाताई यांनी हा प्रवेश घेतला असल्याचे सांगितले.
 
या कार्यक्रमासाठी जिल्हाप्रमुख नितीन मते व बंडू मेंगाजी हजारे , युवा सेना कार्यकारी सदस्य हर्षल शिंदे, युवराजजी धानोरकर, मीनल ताई आत्राम, प्रतिमा ताई ठाकूर ,भरत गुप्ता . संतोष पारखी, या सह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Comments