१२० नागरिकांनी घेतला आरोग्य शिबीराचा लाभ**ग्राहक पंचायत भद्रावती तर्फे मोफत आरोग्य शिबीराचे आयोज*

*१२० नागरिकांनी घेतला आरोग्य शिबीराचा लाभ*

*ग्राहक पंचायत भद्रावती तर्फे मोफत आरोग्य शिबीराचे आयोज*

अतुल कोल्हे भद्रावती
               अखिल भारतीय ग्राहक पंचायत, भद्रावती मागील ३५ वर्षांपासून ग्राहक न्यायासाठी, समाजकार्य तसेच आरोग्य शिबीरा मार्फत अनेक नागरिकांना मोफत उपचार करून समाजासाठी कार्य करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जागतिक आरोग्य दिना निमित्त मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन दि. ०७ एप्रिल ला समाजभवन, ठेंगे प्लॉट येथे  करण्यात आले.

     मोफत आरोग्य शिबीरात नेत्ररोग तपासणी करिता प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. गुंजन कांबळे, आध्यवी नेत्रालय, चंद्रपूर हे होते. त्यांनी तपासणी करून ज्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे अशा नागरिकांना सवलतीदरात शस्त्रक्रिया करण्याचे आस्वासन दिले.
     बी.पी., शुगर तपासणी करिता ग्रामिण रूग्णालय भद्रावतीच्या अधीपरिचारिका वैशाली थेरकर, समुपदेशक स्वेता कांचर्लावार तर आभा कार्डच्या नोंदणीसाठी आरोग्य सेवक साहिल होकम, आशा वर्कर योगिता बुरडकर, हत्तीरोग आरोग्य मोहिमेसाठी स्वयंसेवीका ज्योत्सना श्रीरामे यांनी सेवा दिली. तर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. मनीष सींग आणि डॉ. विनय कुंभारे यांनी मदत केली.
     कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, भद्रावतीच्या महिला कार्यकारिणी पदाधिकारी करूणा मोघे, शोभा साखरकर, शिला आगलावे, माया नारळे, शिला चामाटे, लिला ढवळे, छाया वर्हाटे तर पुरुष कार्यकारिणी चे प्रवीण चिमुरकर, वसंत वर्हाटे, वामन नामपल्लीवार, मोहन मारगोनवार, सुदर्शन तनगुलवार, बालाजी दांडेकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी महत्वाची भुमिका पार पाडली.


Comments