राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघाचे क्षेत्रीय आयुक्तांना कामगारांच्या समस्यांविषयी निवेदन**बैठकीत विविध समस्यांवर चर्चा*
*बैठकीत विविध समस्यांवर चर्चा*
अतुल कोल्हे भद्रावती :
सेवानिवृत्त कामगारांचा भविष्य निधी वेळेवर न मिळणे, विधवा पेन्शन प्रकरणे व रिवाइज पेन्शन प्रकरणे अनेक दिवसांपर्यंत पेंडिंग राहणे. आदी विविध समस्यांच्या त्वरित निवारणासाठी माजरी येथील राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघाद्वारे नागपूर येथील कोयला खान भविष्य निधी कार्यालयाच्या क्षेत्रीय आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले. कामगारांच्या पासबुक पोस्टींग अनेक दिवसांपर्यंत पेंडिंग राहत आहे,भविष्य निधीच्या पोर्टलवरील रकमेत विसंगती दिसून येणे, रेकोनसीलेशन क्लियरन्स सर्टिफिकेट क्षेत्राला न मिळणे इत्यादी कामगारांच्या समस्या घेऊन नागपूर आयुक्त कार्यालयात आयुक्तांसोबत मजदूर संघाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत दोन तास या समस्यांवर चर्चा करण्यात आली.या सर्व समस्या एका महिन्याच्या आत निकालात काढल्या जाईल असे आश्वासन यावेळी आयुक्त जयंत चौधरी यांनी बैठकीला उपस्थित मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिले. सदर बैठकीला माजरी क्षेत्रिय इंटकचे अध्यक्ष धनंजय गुंडावार, क्षेत्रीय सचिव परमानंद चौबे, क्षेत्रीय पदाधिकारी सुभाष बहादे, हंसराज पारखी, ओमप्रकाश वैद्य आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment