जुन्या वैमनस्यातून चाकू ने हल्ला* *गळा आणि पोटात वार केल्याने युवकाची स्थिती चिंताजनक*

*जुन्या वैमनस्यातून चाकू ने हल्ला*
 *गळा आणि पोटात वार केल्याने युवकाची स्थिती चिंताजनक*

 माजरी प्रतिनिधी दि.२७.०४.२४

माजरी- माजरीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या पाटाळा येथील २४ वर्षीय तरुणाला वणी वरोरा जुना रस्ता वर्धा नदी जगन्नाथ मंदिराजवळ डिझेल घेण्याच्या बहाण्याने बोलावून त्याच्या गळ्यात व पोटात चाकूने (धारदार चाकू) वार करून आरोपी पडून गेला. जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी चाकूने हमाला केला असे सांगण्यात येत आहे. जखमी व्यक्ती तिथेच पडला. जखमी व्यक्ती चे नाव धीरज घानवडे, वय २४, रा. पाटाळा जुनी बस्ती असे जखमीचे नाव आहे.

 माजरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार सारंग मिराशी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमी धीरज घानोडे याचा मावस भाऊ सतीश बोधणे यांनी दिलेल्या तक्रारी वरून शुक्रवारी रात्री९.१५ च्या दरम्यान नारायण मोरकुटे नावाचा व्यक्ती मोटारसायकलवरून आला आणि कोणीतरी धीरजवर हल्ला केला. सतीश बोधने तात्काळ घटनास्थळ गाठून जखमी व्यक्तीला तातडीने वेकोली माजरी येथील रुग्णवाहिकेतून वरोरा उपजिल्हा रुग्णालयात नेले.  मात्र चाकूच्या जखमेचे गांभीर्य, ​​घशातून व पोटातून अत्याधिक रक्त वाहत असल्याने व पोटातल्या आतड्या बाहेर येत असल्याने त्यांना तातडीने चंद्रपूरच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.  माहिती नुसार धीरज घानोडे हा घरीच होता.त्यांच्या मोबाईलवर वेदांत हिकरे, रा.राजूर कॉलरी तालुका, वणी जिल्हा यवतमाळ यांचा फोन आला की, त्यांनी डिझेल घेण्यासाठी राळेगाव फाटा जगन्नाथ मंदिराजवळील पुलाखाली येण्यास सांगितले वेदांत हीकरे व त्याचा मित्र प्रज्वल शेंडे तिथे पहिलेच पोहोचला होता.  वेदांत हिकरे याने त्याचा मित्र प्रज्वल शेंडे याला खर्रा आणण्यास सांगितल्यानंतर धीरज घानोडे याच्या मानेवर व पोटात धारदार चाकूने वार करून तेथून पळ काढला.
------------------------------------------------------------
*माजरी पोलिसांनी हल्लेखोर आरोपीला केली अटक*
 माजरी पोलिसांना याची माहिती मिळताच माजरी पोलिसांनी तीन-चार पथके तयार करून आरोपींच्या शोधासाठी रवाना केले, आरोपी राजूर कोलरी तालुका, वणी जिल्हा, यवतमाळ येथे लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून हल्लेखोर आरोपी वेदांत हिकरे, वय २२ रा. राजूर कोलरी ल अटक केले आहे. 

 *जखमींची प्रकृती चिंताजनक*
 जखमी धीरजला चंद्रपूरच्या जिल्हा रुग्णालयात नेण्याऐवजी त्याला खासगी रुग्णालयात डॉ.मानवटकर यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मिळालेल्या माहितीनुसार त्याच्या पोटावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली असून आणखी दोन शस्त्रक्रिया कराव्या लागतील.  जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.
 वरोरा पोलीस उपविभागीय अधिकारी नयोमी साटम घटनास्थळी पोहोचले, याशिवाय चंद्रपूर येथून फॉरेन्सिक लॅब आणि फिंगर प्रिंट तज्ञांनाही पाचारण करण्यात आले.  वरोरा पोलीस उपविभागीय अधिकारी नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली माजरी ठाणेदार सारंग मिराशी तपास करत आहेत.


Comments