हेल्पिंग हँड्स मल्टीपर्पज सोसायटी भद्रावती तर्फे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शालेय संगणक साक्षरता अभियान*

*हेल्पिंग हँड्स मल्टीपर्पज सोसायटी भद्रावती तर्फे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शालेय संगणक साक्षरता अभियान*

अतुल कोल्हे भद्रावती :
                हेल्पिंग हँड्स मल्टीपर्पज सोसायटी भद्रावती तर्फे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शालेय संगणक साक्षरता अभियान सुरू आहे. भद्रावती तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा चिरादेवी येथे हे अभियान साप्ताहिक रित्या सुरू आहे. सध्याची तांत्रिक प्रगती पाहता सर्व पालक आपल्या मुलांचे प्रवेश खाजगी शाळेत घेऊ लागले आहेत. त्यामुळे गावातील व तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची संख्या व विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. त्याकरिता मुलांना शिक्षणाची गोडी कशी वाढवता येईल व वाढत्या तंत्रज्ञानाचा अनुभव प्राथमिक वर्गापासूनच घेता यावा हे या उपक्रमाचे उद्देश समोर ठेवून हेल्पिंग हॅन्ड संस्थेने ही सुरुवात केली आहे. 
सदर उपक्रमाला उद्घाटक म्हणून चिरादेवी गावच्या सरपंच मेश्राम ताई आणि शाळेतील शिक्षक मुसळे सर उपस्थित होते आणि जवळपास ३८ मुलांचा उत्तम प्रतिसाद लाभला.  हा उपक्रम प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत चालणार आहे. सदर उपक्रमात संस्थेतील कृतांत सहारे, सोनल उमाटे, अंकित तोडे, सागर निरंजने, रीता सहारे, मनोज पेटकर, स्वप्निल मत्ते, निखिल उंबरकर, दीपक कावटे, पंकज खामनकर, कार्तिक गनफाडे व इतर सदस्य होते.

Comments