आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड, ई-श्रम कार्ड यांचे माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते वाटप. व रांगोळी स्पर्धचे बक्षीस वितरण
रांगोळी स्पर्धचे बक्षीस वितरण
जागतिक महिला दिनानिमित्त आदरणीय श्रीमती श्वेताताई देवतळे यांचा जाहीर सत्कार
चेतन लुतडे वरोरा
आज दिनांक १०/०३/२०२४ रोजी भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय इथे डॉ. सागर वझे संकल्पित मोहल्ला ई सेवा केंद्रातर्फे प्रभागनिहाय काढण्यात आलेले आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड, ई-श्रम कार्ड यांचे वाटप करण्यात आले आहे तथा बेटी बचाव, बेटी पढाओ व पर्यावरण संवधर्न या विषयावर आधारित रांगोळी स्पर्धचे बक्षीस वितरण तथा जागतिक महिला दिनानिमित्त आदरणीय श्रीमती श्वेताताई देवतळे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला .
या कार्यक्रमात झालेल्या रांगोळी स्पर्धेचे १२ प्रभागात प्रथम, द्वितीय तथा तृतीय रोख पारितोषिक केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय डॉ. रामेश राजूरकर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री भगवान गायकवाड , श्री सुरेश महाजन , शुभांगीताई निंबाळकर ,सायराताई शेख तथा मा. श्री. डॉ. विनायकराव वझे मेमोरियल ट्रस्ट अंतर्गत विशेष उपस्थिती म्हणून सौ. रोहिणी ताई देवतळे, सौ. सुनिता ताई काकडे, सौ. किर्ती ताई कातोरे, श्री. राजुभाऊ गायकवाड, श्री अहेतेशाम अली, श्री वामन भाऊ तूर्के, श्री करण देवतळे हे प्रामुख्याने उपस्थीत होते .
कार्यक्रमासाठी वरोरा शहरातील लाभार्थी नागरिक तथा भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी सागर वझे जनसंपर्क कार्यालय तर्फे घेण्यात आलेल्या या निःशुल्क सेवा शिबिरासाठी मार्गदर्शन करतांना आदरणीय हंसराज भैय्या अहिर यांनी डॉ. सागर वझे व त्यांच्या संपूर्ण चमुचे अभिनंदन केले. तसेच ही निःशुल्क सेवाभावी कार्य वरोरा तालुक्यात अविरत चालू राहील अशी ग्वाही यांनी दिली.
या कार्यक्रम मध्ये श्री प्रकाश श्रवण बोंडे आयुष्यमान कार्ड चे लाभार्थी यांना १० दिवसा आधी हृदयविकाराचा झटका आला असता त्यांना चंद्रपूर येथे नेले तेव्हा त्यांना ३ लाख खर्च सांगितला गेला होता पण त्यांच्या कडे आयुष्यमान कार्ड असल्यामुळे त्यांना निःशुल्क हृदयविकार सेवा नागपूर येथील शुअरटेक हॉस्पिटल इथे चालू आहे असे भावूक उदगार त्यांचे भाचे श्री. नंदकिशोर विधाते यांनी व्यासपीठावर व्यक्त केली .या कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ . श्री. सागरजी वझे यांनी मांडली व सूत्र संचालन सौ. मंगला डांगरे मॅडम यांनी यशस्वी रित्या पार पडले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. सुनिता ताई काकडे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यास महेश श्रीरंग, संजू राम,अभय मडावी, पंकज जाधव,अरुण मोदी,दिपकजी घुडे,राहुल बंदुरकर आणि जगदीश तोटावर यांची सहकार्य लाभले.
_________________________________________
Comments
Post a Comment