अबकी बार 400 बार ......भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी व रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे राजू पारवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल.

अबकी बार 400 बार ......
भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी व रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे राजू पारवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल.

नागपूर
फक्त बातमी 

लोकसभा निवडणुक २०२४ च्या पहिल्या टप्प्यात आज नागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार नितीनजी गडकरी आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे या महायुतीच्या दोन्ही अधिकृत उमेदवारांचे निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह उपस्थित राहून महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले. 
यानिमित्ताने नागपूर शहरातून निघालेल्या भव्य रॅलीमध्ये सहभाग घेतला. तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिलेल्या 'अब की बार, चारसो पार', 'आवाज कुणाचा... शिवसेनेचा...' अशा घोषणांनी संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला. महायुतीच्या उमेदवारांना मिळत असलेला जनतेचा उदंड प्रतिसाद पाहून लोकसभा निवडणुकीत या दोन्ही मतदारसंघातून महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचा प्रचंड बहुमताने विजय होईल, आणि पुन्हा एकदा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पंतप्रधानपदी विराजमान होतील असा विश्वास यावेळी बोलताना व्यक्त केला. 

यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, खासदार कृपाल तुमाने, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे, राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष माजी आमदार पाशा पटेल तसेच महायुतीतील सर्व पदाधिकारी आणि घटक पक्षांचे सदस्य उपस्थित होते.
happy birthday pankajbhau

Comments