वरोरा नगर परिषदेच्या सजावटीदार लाईट निविदा रद्द करण्याची मागणी; विरोधक आक्रमक

वरोरा नगर परिषदेच्या सजावटीदार लाईट निविदा रद्द करण्याची मागणी; विरोधक आक्रमक वरोरा: वरोरा नगर परिषदेने अंबादेवी मंदिर ते बशीर ऑईल मिलपर्यंत सजावटीदार स्ट्रीट लाईट बसविण्यासाठी काढलेल्या निविदेमुळे शहरातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. विरोधी गटातील नगरसेवकांनी ही निविदा रद्द करण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे केली असून, हा शासकीय निधीचा गैरवापर असल्याचा आरोप केला आहे. विरोधी गटाच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात, प्रस्तावित मार्गावर सध्या असलेल्या स्ट्रीट लाईट पूर्णपणे सुस्थितीत असल्याचे म्हटले आहे. नगरसेवक कुरेकर यांनी नमूद केले की, जनतेकडून अशा कामाची कोणतीही मागणी नसताना नवीन सजावटीदार लाईट बसविणे म्हणजे प्रशासनाचा गैरकारभार आहे. विरोधकांनी केलेल्या मुख्य आक्षेपांपैकी एक म्हणजे दलित वस्ती प्रभागातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. निवेदनात म्हटले आहे की, दलित वस्ती प्रभागात नाली बांधकाम, रस्ते, हँडपंप दुरुस्ती व शौचालये यासारख्या मूलभूत गरजा असताना केवळ दिसायला आकर्षक अशा सजावटीदार लाईटवर खर्च करणे संशयास्पद आहे. ...

माढेळीकरांनी दिली सामाजिक कार्यकर्ते किशोर टोंगे यांना पाठींब्याची हाक*

*माढेळीकरांनी दिली सामाजिक कार्यकर्ते किशोर टोंगे यांना पाठींब्याची हाक*

माढेळी 
प्रतिनिधी
         वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते किशोर टोंगे यांनी वरोरा तालुक्यातील माढेळी येथे भेट दिली व विविध क्षेत्रातील लोकांशी संवाद साधला. यावेळी येथील ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ता किशोर टोंगे यांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची आपण तयारी करा! आपल्या सारख्या युवा, उच्चशिक्षित आणि दूरदर्शी नेतृत्वाची मतदार संघाला गरज आहे. यासाठी आम्ही तन मन धनाने आपल्या सोबत आहोत अशा भावना व्यक्त केल्या.
या मतदार संघात युवा व उच्चशिक्षित सर्व सामान्य जनतेची काम करणारा नेता हवा आहे म्हणून आपण या मतदार संघांचे आमदार व्हा आणि हा मतदारसंघ सुजलाम सुफलाम करा यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. मतदार संघात शेतकऱ्यांचे, बेरोजगारीचे, शिक्षणाचे, रस्त्याचे, सिंचनाचे, महिलांचे, सामान्य लोकांचे अनेक प्रश्न आणि समस्या आहे. त्या आपण मार्गी लावण्यासाठी आपण या मतदार संघाचे विधानसभेत नेतृत्व करा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर पणे उभ राहू असा विश्वास दिला.
त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, असे विविध पदाधिकारी उपस्थित होते. यात सर्वश्री जलद मोहल्ले, देवराव देवतळे, अमोल काटकर, महेश देवतळे, संतोष तळस, प्रमोद देवतळे, होमेश वरभे, महेंद्र बहादे, राहुल वाघ, आशिष खडसे, प्रमोद चालखुरे इ. उपस्थित होते.

Comments