अँड.सायली बुजोणे हिला बेस्ट फ्रेंचायसी अवार्ड*

अँड.सायली बुजोणे हिला बेस्ट फ्रेंचायसी अवार्ड*

वरोडा
शाम ठेंगडी
      स्मार्ट कीड अबॅकस तर्फे पुणे येथे तेरावी राष्ट्रीय आणि सहावी आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धा नुकतीच घेण्यात आली. या स्पर्धेत देशभरातील तसेच देशाबाहेरील जवळपास 3000 विद्यार्थी सहभागी झाले होते. पुणे येथे झालेल्या या स्पर्धेत एड.सायली शिवम बुजोणे हिला विदर्भातून बेस्ट फ्रेंचायसी अवॉर्ड प्राप्त झाला.एड. सायली बुजोणे या वरोड्यातील  विद्यार्थ्यांना अबॅकस व वैदिक गणिताचे शिक्षण देत असतात.
        पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत वरोड्यातील 14 विद्यार्थी या  सहभागी झाले होते. 
    अबॅकस आणि वैदिक गणित या या विजया विषयांच्या स्तरीय स्पर्धेमध्ये  सहभागी झालेले तीन  विद्यार्थी यशस्वी झाले असून त्यात अनोखी भट्टड हिचा प्रथम, सार्थक नेवासकर यांचा द्वितीय तर प्रथमेश कोहळे याने तृतीय क्रमांक पटकावला.या यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच एडवोकेट सायली बुजोणे यांचे शहरात कौतुक होत आहे.

Comments