शिवसेना (उबाठा ) कार्यकर्ते चड्डा कंपनीवर धडकले**स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी*

*शिवसेना (उबाठा ) कार्यकर्ते चड्डा कंपनीवर धडकले*

*स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी*

अतुल कोल्हे भद्रावती - 
           वेकोलि माजरी क्षेत्रांतर्गत चड्डा कंपनीला माती काढण्याचे साडेतीन वर्षाचे कंत्राट मिळाले. या कामात सदर कंपनीला मोठ्या संख्येत मनुष्यबळ लागणार आहे. परंतु चड्डा कंपनी आपल्या सोबत बाहेरचे कामगारांना आणून मागील दोन महिन्यापासून काम सुरु केले आहे. सद्या कंपनीचे काम जोरात सुरु आहे. यापूर्वी सुद्धा चड्डा कंपनी माजरी क्षेत्रात काम केले होते. त्यावेळी सुद्धा स्थानिकांना डावलून बाहेरील कामगारांना कामावर घेवून काम केले होते. त्यावेळी चड्डा कंपनीला राजकीय आशीर्वाद प्राप्त असल्यामुळे ते यशस्वीही झाले. मात्र त्यावेळी स्थानिकांना डावलून काम केल्यामुळे चड्डा कंपनी विरुद्ध स्थानिकांच्या मनात रोष निर्माण झाले होते. आता ही कंपनी त्याच पद्धतीने काम करण्याच्या तयारीत आहे.
कंपनी प्रशासनाचा स्थानिकांच्या प्रती विरोधी भूमिका लक्षात घेत स्थानिक बेरोजगार युवकांवर अन्याय होवू नये यासाठी संवैधानिक मार्गाने शिवसेना (उबाठा ) गटाचे शहरप्रमुख रविशंकर राय यांनी विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात चड्डा कंपनी सह प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देवून चड्डा कंपनीत स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
दरम्यान या खाजगी कंपनीला वारंवार निवेदने देवूनसुद्धा स्थानिकांना डावलून कंपनीने काम सुरु केले. सद्या कंपनीचे काम जोराने सुरु आहे.  दरम्यान स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता लक्ष वेधून घेण्यासाठी शिवसेना (उबाठा ) कार्यकर्त्यांनी चड्डा कंपनीवर रविवारी धडक दिली. दरम्यान कंपनी व्यवस्थापनाने शिवसैनिकांना चर्चेसाठी ऑफिसमध्ये बोलाविले.
दरम्यान चर्चेसाठी शिवसेना शहरप्रमुख रविशंकर राय यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक चड्डा कंपनीचे व्यवस्थापक चित्तरंजन सिंग यांच्या उपस्तितीत पार पडली. या बैठकीत कंपनीचे व्यवस्थापक चित्तरंजन सिंग यांनी स्थानिकांना रोजगार देण्यासंदर्भात वरिष्ठांशी बोलण्यासाठी दोन दिवसाचा वेळ द्या अशी मागणी केली. यावर उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कंपनी व्यवस्थापकाची मागणी मान्य करून यावर तोडगा काढण्यासाठी व सकारात्मक चर्चा करण्यासाठी दोन दिवसाचा वेळ दिला. 
दरम्यान चड्डा कंपनीत रोजगार संदर्भात शिवसेनेकडून अनेक प्रयत्न सुरु असून माजरी परिसरातील बेरोजगार युवकांची अवस्था प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. हाताला काम आणि नौकरी नसल्याने युवकवर्ग वैफल्यग्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. मात्र बेरोजगाराना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून कोणतीही पावले उचलण्यात आले नाही हे चिंतनीय बाब आहे.  यापुढे शिवसेनेकडून संवैधानिक मार्गाने आंदोलन करण्यात येणार आहे. जर संवैधानिक मार्गाने न्याय मिळत नसेल तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी रविशंकर राय यांनी दिला.
यावेळी उपतालुका प्रमुख रवि भोगे, विभागप्रमुख बंडू मांढरे, उपशहर प्रमुख चंद्रहास राम, शाखाप्रमुख विवेक सूर्यवंशी, मो. अंसार खान, सुनील राजपूत, राजू प्रजापती, राकेश तोटा, प्रमोद ढगे, शुभम सोयाम,सदानंद दासारपू, राजा खान, रवि निषाद, सतीश खडसकर, अंकित मांढरे, नितीन जाधव आदि उपस्थित होते.

Comments