गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गजानन नगरातील बगिच्याचे लोकार्पण; नागरिकांना मिळाली स्वच्छ व सुरक्षित जागा.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गजानन नगरातील बगिच्याचे लोकार्पण; नागरिकांना मिळाली स्वच्छ व सुरक्षित जागा. वरोरा:22/3/26 शहरातील ओपन स्पेसमध्ये साफसफाई आणि लाइटिंगच्या सुविधांअभावी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, नवनियुक्त नगरसेवक बंडू देऊळकर यांच्या प्रयत्नातून वार्डातील साफसफाईला सुरुवात झाली असून ओपन स्पेस विकसित करण्याचा त्यांचा मानस आहे. याचाच एक भाग म्हणून गजानन नगर येथील ओपन स्पेस मध्ये आमदार व नगरपालिकेच्या सहकार्यातून  सर्वांगीण साफसफाई करून नवीन लाइट सिस्टीम बसविण्यात आली होती.  गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नगराध्यक्षा अर्चना आशिष ठाकरे यांच्या हस्ते या बगिच्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितीत नगरसेवक बंडूभाऊ देऊळकर, अनिलभाऊ झोटिंग, राहुल देवडे, अनिल पाटील सर, गौरकर सर, गोखरे सर, गठ्ठना मामा, धोटे सर, बुरीले सर, चौधरी सर, डॉ. हटवार साहेब, सौ. हटवार, संगीत नवघरे, सौ. नवघरे मॅडम यांच्यासह परिसरातील मान्यवर उपस्थित होते. नवनियुक्त नगरसेवक बंडू देऊळकर यांच्या प्रयत्नांतून वार्डातील साफसफाई व विकासाची कामे सुरू असून ओपन ...

बरांज येथील प्रकल्पग्रस्त महिलांचे अन्न त्याग आंदोलन सुरू**दिव्यांग प्रकल्पग्रस्ताचाही उपोषणात सहभाग*

*बरांज येथील प्रकल्पग्रस्त महिलांचे अन्न त्याग आंदोलन सुरू*

*दिव्यांग प्रकल्पग्रस्ताचाही उपोषणात सहभाग*

अतुल कोल्हे भद्रावती :-
                   गेल्या 62 दिवसांपासून सुरु असलेले बरांज  येथील महिला प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन हे गंभीर वळण घेताना दिसत आहे. सदर आंदोलनाचा अद्यापही तोडगा न निघाल्याने महिलांनी जलसमाधीचा इशारा देत 10 महिला खाण परिसरातील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात उतरल्या आहेत. तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या उद्देशाने सदर प्रकल्पग्रस्त महिलांनी आता अन्नत्याग  आंदोलनाला सुरुवात केली आहे.
 या आंदोलनात गावातील दिव्यांग प्रकल्पग्रस्त संतोष पुनवटकर हे सुद्धा सहभागी झाले असून आपल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे येथे सुरू असलेल्या आंदोलनातील तिढा अद्याप कायम आहे. कंपनी व जिल्हा प्रशासन जोपर्यंत अठरा मागण्यांच्या पूर्ततेचे लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू ठेवण्याच्या  निर्धारावर हे महिला प्रकल्पग्रस्त ठाम असून यामुळे प्रशासना समोरील पेच वाढला आहे. उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे यांनी खड्ड्यात उतरून आंदोलन करणार्या  दहा महिलांची भेट घेतली व त्यांना खड्ड्याच्या बाहेर निघण्याची सूचना दिली. मात्र महिलांनी खड्ड्यातून बाहेर निघण्यास नकार दिला आहे. या प्रकरणात दोन्ही कंपनीशी चर्चा करून चौकशी करू असे उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे यांनी सांगितले आहे.

Comments