__________________________________________
वरोडा : 29/2/2024 shyam Thengadi
वरोडा नजीक असलेल्या एका कॉटन जिनिंग प्रेसिंग मध्ये आज 29 फरवरी रोज गुरुवारला सकाळी साडे आठच्या सुमारास लागलेल्या आगीत जवळपास साडे चारशे क्विंटल कापूस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.या आगीत जिनिंगचे 32 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
वरोडा- मार्डा रोडवर असलेल्या स्वामी कॉटन जिनिंग प्रेसिंग ला आज सकाळी साडेआठच्या सुमाराला आग लागल्याची घटना उपस्थित ग्रेडरच्या लक्षात आले.ग्रेडरने त्वरेने हालचाल करून कॉटन जिनिंग मधील अग्निशामक व्यवस्था कर्मचाऱ्यांच्या मदतीने आग कार्यान्वित केली व कापूस विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत आगीने एका कापसाच्या गंजीला आपल्या वेढ्यात घेतले होते.
या गंजीला लागूनच जवळच कापसाची दुसरी गंजी असल्याने याही गंजीला आग लागण्याचा धोका लक्षात घेत तेथील व्यवस्थापनाने जेसीबीने या दोन गंजी मधील कापूस बाजूला फेकत या दोन गंजी मध्ये गल्ली तयार केली. त्यामुळे या आगीचा दुसऱ्या गंजीला अपाय होऊ शकला नाही.
यादरम्यान वरोडा नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाला आगीची सूचना देण्यात आली.नगरपरिषदेचा अग्निशमन विभाग पंधरा मिनिटात घटनास्थळी दाखल झाला.तोपर्यंत जिनिंग मधील कर्मचाऱ्यांनी आगीवर थोडे बहुत नियंत्रण मिळवले होते.
अग्निशमन दल व कर्मचाऱ्यांनी मिळून आग आटोक्यात आणली. गंजीतील कापूस जेसीबीने उचलून जिनिंगसाठी टाकत असताना जेसीबी चे पाते सिमेंटला घासल्या गेल्याने निर्माण झालेल्या ठिणगीने ही आग लागली असावी असा व्यवस्थापनाचा अंदाज आहे.
याच परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असल्यास ते पडताळण्याची गरज आहे.
या आगीवर कर्मचारी व अग्निशमन दल यांच्या अथक परिश्रमाने एका तासात ही आग आटोक्यात आली.