बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा.

दर्पणकार  बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

राजकारण्यांना जिवंत ठेवण्याचे काम पत्रकार करतात.
आमदार प्रतिभाताई धानोरकर

पत्रकारांनी पर्यावरण व सेंद्रिय शेती यावर प्रकाश टाकण्याची गरज, शेतकरी प्रोड्युसर कंपनी अध्यक्ष नरेंद्र जीवतोडे.

वरोरा
चेतन लुतडे

वरोरा तालुक्यातील व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या वतीने स्थानिक रॉयल प्लाझा हॉल मध्ये  पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी पत्रकारांना शुभेच्छा देत आपले मत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी पत्रकारांना व नववर्षाच्या शुभेच्छा देत राजकारण्यांना जिवंत ठेवण्याचे काम पत्रकार करतात . त्यामुळे  पत्रकारांसाठी स्वतःच्या हक्काचे भवन उभारण्यासाठी 25 लाखाचा बांधकाम निधी आमदार फंडातून देण्याचा मानस त्यांनी दाखवला. या संबंधित पत्रकारांनी आपली जागा शोधावी जेणेकरून लवकरच भवन उभारणीसाठी काम करण्यात येईल. व्हॉइस ऑफ मीडियाचे देश पातळीवर चांगले काम सुरू असून पत्रकाराच्या चांगल्या कामात स्थानिक आमदार म्हणून माझा नेहमी हातभार लागेल अशी ग्वाही पत्रकारांना दिली.

समाज घडवण्यासाठी पत्रकारांचा सर्वात मोठा हातभार असून कोणतीही छोटी गोष्ट समाजापुढे नेण्याचे काम पत्रकार करीत असतात. पोलिसांप्रमाणेच पत्रकारांचे जाळे गाव खेड्यात पसरली असून छोट्याशा गावात घडणाऱ्या बातम्या प्रसारित करून समाजातील लोकांचे स्थान दर्शवून देतात त्यामुळे पत्रकार समाज घडवीत असतात असे मत वरोरा ठाणेदार अमोल काचोरे यांनी व्यक्त केले.

 व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेने जी पंचसूत्री हातात घेतलेली आहे ती वाखाण्याजोगी आहे.भारतात पत्रकार हा चौथा स्तंभ आहे.या चौथ्या स्तंभची नितांत गरज आहे. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी त्यावेळी सुद्धा समाजप्रबोधनाचे कार्य करून समाजाला दिशा व दशा दाखवण्याचे काम केले. पत्रकार आणि राजकारणी दोन सखे भाऊ आहेत. त्यामुळे घरात दोन भावांमध्ये प्रेम असते तसेच भांडणेही सुद्धा होतात त्यामुळे पत्रकारांनी  निपक्ष पत्रकारिता करणे गरजेचे आहे. असे मत शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी व्यक्त केले.

पंजाब राज्यात कॅन्सरची रांग लागलेली आहे याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल स्प्रेइंग केल्या जाते. त्यामुळे वेगवेगळ्या खाण्यामधून हे केमिकल मनुष्याच्या पोटामध्ये जात असतात त्यामुळे कॅन्सरचे रुग्ण आता महाराष्ट्रात सुद्धा वाढत आहेत. त्यामुळे पत्रकारांनी प्रमुख चार बाबींवर प्रकाश देण्याची गरज आहे.
प्रथम पाण्याच्या पातळीचा स्तर कोळसा उत्खन केल्याने साडेचारशे फुटापर्यंत खाली गेलेला आहे. दुसरा शेतीमध्ये केमिकल स्प्रेइंग मोठ्या प्रमाणात केल्याने कॅन्सरचे रुग्ण वाढत आहे. तिसरा कोळस्या पासून होणारे प्रदूषण  आणि वाढती गुन्हेगारी या  चार  विषयावर पत्रकारांनी जास्तीत जास्त भर देण्याची गरज असल्याचे मत वैनगंगा व्हॅली, शेतकरी प्रोडूसर कंपनीचे अध्यक्ष नरेंद्र जिवतोडे यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार , दै.तरुण भारत वृत्तपत्रासाठी  40 वर्ष पत्रकारिता करणारे शाम ठेंगडी सर यांचा त्यांनी केलेल्या कार्याबद्दल आमदार प्रतिभाताई धानोरकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी पत्रकारांना संबोधित करताना पत्रकारिता करताना येणाऱ्या अडचणी व त्यामधून निघणारे मार्ग सोप्या पद्धतीने समजावून सांगितले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार वितरक संजय पोटे यांना त्यांच्या अविरत  कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर दैनिक देशोन्नती चे पत्रकार अविनाश बन यांची मुलगी  गोंडवाना युनिव्हर्सिटीच्या MSC परीक्षेत गोल्ड मेडल मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.



यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांचा सत्कार आमदार प्रतीभाताई धानोरकर यांनी केला. यावेळी शहर प्रमुख राजेश डांगे उपस्थित होते.



यावेळी या कार्यक्रमासाठी पत्रकारांचे सहकुटुंब उपस्थित होते  त्यांच्याद्वारे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांना मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

ग्रीनवेचे मालक तथा काँग्रेसचे युवा विदर्भ संघटक शुभम चिंमूरकर यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. 

मॉर्निंग वॉक ग्रुपचे सचिव रवी शिंदे यांचा सत्कार व्हाईस ऑफ मीडियाचे कोषाध्यक्ष शाहिद अख्तर यांनी केला.


या कार्यक्रमासाठी व्हाईस ऑफ मिडियाचे राज्य कार्यकारिणीचे मंगेशची खाटीक, अनिल पाटील ,शाम ठेंगडी यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष संजय पडोळे व तालुकाध्यक्ष चेतन लुतडे व  कार्यकारिणी सदस्य दै.नवजीवन रवी खाडे, सकाळ बालकदास मोटघरे, देशोन्नती अविनाश बंन, स्टार न्युजचे सारथी ठाकूर, कोषाध्यक्ष शाहिद अख्तर ‌, पुण्यनगरी अनिल नौकरकार, नागपूर पोस्ट हरीश केशवानी, रोहित घाडगे, शिरीष ऊगे, विशाल मोरे, गोपाल निब्रड, सुरेश जाधव,नरेश साळवे, शफी भाई  व इतर सदस्य सहकुटुंब पत्रकार दिन साजरा करण्यासाठी उपस्थितीत होते. 
दै.लोकमत समाचार चे प्रतिनिधी सादिक 
थैम यांनी शहर प्रमुख शिवसेना राजेश डांगे यांचे स्वागत केले.

व्हॉइस ऑफ मिडिया पत्रकार संघटनेच्या वतीने शैक्षणिक किट वितरण मान्यवर आमदार प्रतिभाताई धानोरकर व शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते व तालुका प्रमुख राजेश डांगे यांच्या हस्ते करण्यात आले.


  

Comments