खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार: पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार  पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला बातमी: वरोरा 16/4/26 वरोरा : १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या उत्सवी वातावरणात आंबेडकर चौक, वरोरा येथे अचानक आग लागल्याची घटना घडली. या गंभीर प्रसंगी सहाय्यक  पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांनी विलक्षण तत्परता आणि धाडस दाखवत स्वतः पुढाकार घेत, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. त्यांच्या या वेगवान व धैर्यशील कृतीमुळे मोठा अनर्थ टळला. या पराक्रमाची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, वरोरा तर्फे पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शरद भस्मे यांच्या कार्यामुळे ‘खाकी’ वर्दीवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. संकटसमयी दाखवलेली त्यांची जबाबदारी, तत्परता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. “संकटाच्या वेळी धावून येणारी खाकीच खरी जनतेची ताकद आहे,” याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद भस्मे य...

बल्लारपूर शहरातील रेल्वेच्या गोल पुलियाची वाहतूक पूर्ववत सुरू करा, राजू झोडे यांचे तहसीलदारांना निवेदन**अन्यथा रेल रोको आंदोलन करू ........*

*बल्लारपूर शहरातील रेल्वेच्या गोल पुलियाची वाहतूक पूर्ववत सुरू करा, राजू झोडे यांचे तहसीलदारांना निवेदन*

*अन्यथा रेल रोको आंदोलन करू ........*

बल्लारशा
शंकर महाकाली

बल्लारपूर शहरातील महत्वाचा मार्ग असलेला रेल्वेच्या गोल पुलियाची वाहतूक मागील 15 दिवसांपासून बंद आहे, त्यामुळं येथील वाहतूक पूर्ववत सुरू करा अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केली आहे.दरम्यान सोमवारी झोडे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकानी तहसीलदारांना निवेदन दिले आहे.

बल्लारपूर शहरातील वस्ती भाग हा अत्यंत महत्वाचा असून अर्धे शहर या ठिकाणी वास्तव्यास आहे.परिणामी मागील 15 दिवसांपासून गोल पुलियाची वाहतूक बंद करम्यात आली असून शाळकरी विद्यार्थी, अंत्यसंस्कार साठी जाणारे नागरिक तथा लहान व्यावसायिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळं तात्काळ हा मार्ग रहदारीसाठी खुला करावा अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशारा राजू झोडे यांनी दिला आहे. यावेळी चेतन गेडाम, संपत कोरडे, ईस्माइल कच्ची, श्यामभाऊ झिलपे,बालकृष्ण कडेल ,गुरू कामटे, नितिन साठे, शंकर महाकाली, रेणूका कडेल, आदि लोक उपस्थित होते

Comments