रिषभ रठ्ठे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.


रिषभ रठ्ठे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.

वरोरा
चेतन लुतडे 

टायगर ग्रुप संस्थापक जालिंदर भाऊ जाधव, टायगर ग्रुप अध्यक्ष पै.तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर ग्रुप वरोरा शहर अध्यक्ष रिषभ भाऊ रठ्ठे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन वरोरा येथील अंबादेवी मंदिरात करण्यात आले होते.

 रक्तदान शिबिराची सुरुवात अंबादेवीचे पूजन करून करण्यात आले, वरोरा शहरातील अंबादेवी मंदिरात रेनबो ब्लड अँड कंपोनंट बँक नागपूर,या रक्तपेढिच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले. यावेळी रक्तदान शिबिरात वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख भाजप चे रमेश राजूरकर,तसेच वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख ( उबाठा) चे रवी शिंदे,माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली,करण भाऊ देवतळे,दत्ता भाऊ बोरेकर,प्रवीण सुराणा,मनीष जेठानी,सनी गुप्ता,राहुल ठेंगणे,ई.मान्यवर उपस्थित होते.

शिबिराला उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व विशद करताना तरुणांनी रक्त दान करण्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. रक्तदान हे कोणत्याही दाणापेक्षा श्रेष्ठ असल्याने रक्तदान हे महादान म्हणून देण्यात येते. 

टायगर ग्रुप वरोरा चे सदस्य,मारोती नामे,वैभव टिपले,मुकेश पाटील,टायगर ग्रुप वणी चे प्रतिक गौरकार, टायगर ग्रुप चिमूर चे रोहन नन्नावरे,टायगर ग्रुप नागरी चे भास्कर भाऊ कोसूरकर,अमित थाटे,टायगर ग्रुप वरोरा चे सदस्य ओम कार्लेकर,ओम पतरंगे,प्रतिक तिराणकर,विक्की गवई,प्रवीण खिरटकर,बादल ठावरी,स्वप्नील नगराळे,महेंद्र तामगाडगे,ई.सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन मंगेश मेश्राम सर यांनी केले,तर आभार रिषभ रठ्ठे  यांनी मानले.आभार मानताना,रिषभ यांनी रक्तदान करून एखाद्याला जिवदान मिळू शकते,म्हणूनच प्रत्येकाने रक्तदान करावे हे,रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.असे आवाहन नागरिकांना करण्यात आले.

Comments