शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन भाऊ मते यांचा आढावा बैठक वरोरा, चंद्रपूर व वरोरा विधानसभा क्षेत्रातील सामाजिक उपक्रमात सहभाग*

*शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन भाऊ मते यांचा आढावा बैठक वरोरा, चंद्रपूर व वरोरा विधानसभा क्षेत्रातील सामाजिक उपक्रमात सहभाग*

भद्रावती

*माननीय मुख्यमंत्री तथा मुख्य नेते शिवसेना श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे आदेशाने व माननीय किरण भाऊ पांडव पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख यांचे सूचनेनुसार श्री दत्तात्रय पईतवार साहेब संपर्कप्रमुख चंद्रपूर जिल्हा यांचे मुख्य उपस्थितीत वरोरा विधानसभा व चंद्रपूर विधानसभा क्षेत्राची आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये माननीय दत्तात्रय जी पईतवार साहेब यांनी सर्व पदाधिकारी यांना शाखाप्रमुख, शिवदूत व बूथ प्रतिनिधी यांच्या नेमणुकीबाबत सूचना देऊन शिवसेना पक्ष चंद्रपूर जिल्ह्यात वाढवण्यासाठी आवश्यक ती मदत देण्याचे आश्वासन दिले . यावेळी बोलताना नितीन भाऊ मते यांनी वरोरा, चंद्रपूर व बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचा झंझावात सुरू असून जवळपास 70 ते 80 टक्के शिवदूत व बूथ प्रतिनिधी नेमण्यात आलेले आहे  अशी माहिती दिली व सर्व पदाधिकारी जोमाने कामाला लागले असून शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करत आहे . श्री नितीन भाऊ मते यांच्या नेतृत्वात या तीनही विधानसभा क्षेत्रात पदाधिकारी यांचा शिवसेना वाढीसाठी अहोरात्र प्रयत्न सुरू आहे . त्याचबरोबर वरोरा येथे आर्य वैश्य समाज वरोरा तर्फे श्री नितीन भाऊ मते व श्री दत्तात्रय पईतवार साहेब यांचा सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमाला उपस्थित राहून समाजाच्या कार्याला जी काही मदत लागेल ती देण्याचा शब्द नितीन मत्ते यांनी दिला त्यानंतर गुरुदेव सेवा मंडळ बिजोणी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून श्री नितीन मते व श्री दत्तात्रय पईतवार साहेब तसेच योगिता ताई लांडगे महिला जिल्हा संघटिका, श्री आशिष ठेंगणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख, ज्योतीताई लांडगे महिला आघाडी तालुकाप्रमुख, श्री कमलेश जी बारस्कर साहेब मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष, श्रीकांत खंगार तालूका प्रमुख वरोरा, श्री मदनबाबू चिकवा उपतालुका प्रमुख भद्रावती, श्री सिंगलदिप पेंदाम उपतालुका प्रमुख भद्रावती, तसेच मनीषा रोडे सरपंच बीजोनी यांनी उपस्थित राहून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कार्याविषयी माहिती पुस्तिका उपस्थित सर्व जनसमुदायाला वितरित केली व शासनाच्या अनेक योजनांची माहिती श्री नितिन मत्ते शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी दिली . त्यानंतर जय जवान जय किसान क्रीडा मंडळ कवठी ता . भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथील कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थिती दर्शवून नितीन मत्ते यांनी खेळाडूंनी खेळ भावना जपावी, मैदानी खेळामुळे शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती येऊन समाजाचे एकीकरण करण्यात या क्रीडा स्पधींचा समाजामध्ये खूप मोठा उपयोग होतो असे मत व्यक्त केले यावेळी संतोष जी पारखी तालुका प्रमुख चंद्रपूर, सचिन जी भोगेकर कवटी हे उपस्थित होते*

Comments