मोदी सरकारच्या समाजातील योजना अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचवा: उपेंद्र कोठेकर**भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन*

*मोदी सरकारच्या समाजातील योजना अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचवा: उपेंद्र कोठेकर*

*भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन*

वरोरा : शाम ठेंगडी 

        देशवासीयांच्या समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी गेल्या 70 वर्षात जे काम झाले नाही. ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी मोदी सरकारने अवघ्या नऊ वर्षात अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. जनतेच्या अपेक्षा व त्यांच्या समस्यांची उकल करणे  यासाठी या योजना तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचल्या पाहिजे. त्या पोहोचवण्याचे दायित्व कार्यकर्त्यांवर आहे.  समाजाच्या अपेक्षांची पुर्तता या कार्यालयातून झाल्यास या कार्यालयाचे फलित झाले असे होईल असे उद्गगार भाजपचे प्रदेश संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर यांनी वरोडा येथे काढले.
      ते येथील अस्थिरोग तज्ञ डॉक्टर सागर वझे यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करताना बोलत होते.
                        यावेळी व्यासपीठावर माजी  केंद्रीय गृहराज्यमंत्री व मागासवर्गीय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराजजी अहिर, राज्याच्या माजी मंत्री शोभाताई फडणवीस, वरोडा विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश राजूरकर, भाजपचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अहेतेशाम अली, भाजयुमोचे प्रदेश सचिव करण देवतळे, नरेंद्रजी जीवतोडे, सुवर्णरेखा पाटील, ओम मांडवकर डॉक्टर गायकवाड, सुरेश महाजन इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. 
                भाजपच्या कार्यपद्धतीत कार्यालयाला एक आगळे वेगळे महत्त्व असल्याचे सांगत उपेंद्र कोठेकर म्हणाले, या कार्यालयातून जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्याचे कार्य होणे आवश्यक आहे.
*सध्या विचारांची लढाई सुरू :अहिर* 
          डॉक्टर सागर वझे यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे कार्यालय सर्वच दृष्टीने सुंदर आहे. सुंदर असलेल्या या कार्यालयात जिवंतपणा पक्षाच्या कार्यातून निश्चितच येईल नसल्याचे मत व्यक्त करत हंसराज अहिर म्हणाले, लोकशाही प्रधान आपल्या देशात विचार चालले पाहिजे. जात-पात नाही. सध्या विचारांची लढाई सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारामुळे जातीचे समीकरण संपले आहे. पंतप्रधान मोदींचे मोदींचे हे विचार अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे आणि हे पोचवण्याचे हे कार्य या कार्यालयातून होईल यात शंका नाही.
*कार्यालय कार्यकर्त्यांचे हक्काचे घर:शोभाताई*
                   कार्यकर्त्याच्या परिश्रमामुळेच पक्ष मोठा होत असल्याचे सांगत राज्याच्या माजी मंत्री शोभाताई फडणवीस म्हणाल्या , कार्यालय हे कार्यकर्त्यांचे हक्काचे घर असते. कार्यकर्त्याला समस्या नसतात. तो जनतेच्या समस्या सोडविण्याचे कार्य करत असतो. हे कार्य या कार्यालयातून व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी कार्यकर्त्याची संघटनेतील भूमिका विशद केली. 
      भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर भारत माता, दीनदयाल उपाध्याय,शामाप्रसाद मुखर्जी, माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. डॉक्टर सागर वझे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उपेंद्रजी कोठेकर यांनी फित कापून केले.या कार्यक्रमात अनेक महिला व पुरुषांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्या सर्वांचे मान्यवरांच्या हस्ते पक्षाचा दुपट्टा टाकून त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.यावेळी जुन्या पिढीतील कट्टर कार्यकर्ता जगदीश तोटावार यांचा शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. डॉक्टर सागर वझे यांनी प्रास्ताविक तर वामन तुर्के यांनी कार्यक्रमाचे संचलन केले.महेशजी श्रीरंग यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments