कला आणि क्रीडा व्यासंगामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो-- डॉक्टर सागर वझे

कला आणि क्रीडा व्यासंगामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो-- डॉक्टर सागर वझे

वरोडा दि 31 डिसेंबर
प्रशांत खुळे 

       विद्यार्थी जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी कला क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्राकडे लक्ष दिल्यास त्यांच्या सर्वांगीण विकास होतो. खेळामुळे आत्मविश्वास वाढून समूह भावना निर्माण होते आणि यश अपयशाची सवय विद्यार्थ्यांना लागते. निरोगी जीवनासाठी खेळ आवश्यक असून विद्यार्थ्यांनी खेळले पाहिजे असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य आणि प्रसिद्ध अस्थीरोग तज्ज्ञ डॉ सागर वझे यांनी केले. लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात ते बोलत होते
         याप्रसंगी मंचावर प्राचार्य राहुल राखे, उपमुख्याध्यापक दीपक नवले, विभाग प्रमुख डॉ प्रशांत खुळे तर विद्यार्थी प्रतिनिधी शशिकांत दातारकर यांची उपस्थिती होती.
       डॉक्टर सागर वझे यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या विकासात योगदान देणार असल्याचे सांगत सिनेटमध्ये प्रस्ताव सादर करून स्पोर्ट्स अकॅडमी करिता 5 कोटी रु ची मागणी मान्य करून घेतल्याचे ते म्हणाले. यामुळे विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील खेळाडूंना सुसज्ज अकॅडमी चा फायदा होईल. लोकशिक्षण संस्थेला व्हॉलीबॉल खेळाची मोठी परंपरा असून विद्यार्थ्यांनी हा वारसा पुढे चालू ठेवावा असे प्रतिपादन त्यांनी केले
        दीपक नवले यांनी विद्यार्थ्यांनी सकारात्मक भावनेने खेळांमध्ये सहभाग घ्यावा असे सांगितले. तर राहुल राखे यांनी आपल्या मनोगतात कला आणि क्रीडा क्षेत्र माणसाच्या आवश्यक गरजा झाल्या असून त्यामुळे मनात उर्मी जागवली जाते. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचे प्रगटीकरण यामुळे होत असल्याचे ते म्हणाले
          याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे मनी जिंकली. समूह नृत्य, एकल नृत्य,  नाटिका, लोककला, लावणी आदिवासी नृत्य आदी कलाविष्कार सादर करण्यात आले. विविध खेळामध्ये विजयी चमुंना याप्रसंगी गौरविण्यात आले
          कार्यक्रमाचे संचालन सानिया शेख,  प्रास्ताविक डॉ प्रशांत खुळे यांनी तर आभार प्रा रवींद्र पवार यांनी मानले.
 

Comments