*डब्ल्यू एस एफ चा प्रशिक व प्रसाद गोंडवाना विद्यापीठ व्हॉलीबॉल संघात.*

*डब्ल्यू एस एफ चा प्रशिक व प्रसाद गोंडवाना विद्यापीठ व्हॉलीबॉल संघात.*

   ..   वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन वरोरा व लोक शिक्षण संस्था वरोडाचे खेळाडू तथा आर. एस. एस. कॉलेज विसापूरचा विद्यार्थी प्रशिक जाधव व राजीव गांधी कॉलेज चंद्रपूरचा विद्यार्थी प्रसाद मिलमिले यांची नांदेड येथे दिनांक १४ डिसेंबर ते १८ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या पश्चिम विभागीय अंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धेकरिता गोंडवना विद्यापीठ गडचिरोली संघात निवड झालेली आहे, प्रशिक याने याआधी विविध राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केलेले असून, प्रसाद ने अनेक राज्य स्पर्धेत प्रतिनिधित्व केले आहे. दोघांच्याही निवडी बद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत असून  प्रसाद व प्रशिक यांच्या निवडीबद्दल लोक शिक्षण संस्था वरोडा अध्यक्ष प्रा. श्रीकांतजी  पाटील, उपाध्यक्ष श्रीकृष्णजी घड्याळपाटील, विश्वनाथ जोशी, ॲड. दुष्यंत देशपांडे, वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन वरोरा चे अध्यक्ष गजानन जीवतोडे, कार्याध्यक्ष किशोर पिरके, आर एस एस कॉलेज विसापूरचे प्राचार्य दिलीप जयस्वाल, राजीव गांधी कॉलेज चंद्रपूरचे प्राचार्य. गिरीश साखुले  यांनी अभिनंदन केले. प्रशिक व प्रसाद यांनी आपल्या यशाचे श्रेय, ज्येष्ठ मार्गदर्शक सुनील बांगडे, विनोद उंमरे, दिनेश ताटेवार, संदीप उपरे ,   संजय अंबुलकर यांना दिले

Comments