चंद्रपुर जिल्हाधिकाऱ्यांचा पुतळा जाळून जाहीर निषेध.*

*चंद्रपुर   जिल्हाधिकाऱ्यांचा पुतळा जाळून जाहीर निषेध.*

 वरोडा: शाम ठेंगडी 
        चंद्रपूर जिल्ह्यातील वरोडा तालुक्यातील पाजरेपार रीठ ते आबमक्ता व पाजरेपार गिरोला या रस्त्यासाठी तेथील शेतकरी २५ वर्षांपासून सतत मागणी करत आहे.या रस्त्याच्या मागणीसाठी सन २०२० पासून भीम आर्मी संविधान रक्षक दल चिमुर - वरोडा तालुका अध्यक्ष जगदीश भाऊ मेश्राम सातत्याने पाठपुरावा करत आहे, शासन व इतर कोणीही या मागणीकडे लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांनी भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या पुढाकाराने आज सकाळी आंदोलन स्थळी जिल्हाधिकाऱ्यांचा पुतळा जाळून त्यांचा निषेध केला.
            वरोडा तहसीलदार,  सार्वजनिक बांधकाम वरोडा विभाग, वरोड्याचे आमदार,  जिल्हाधिकारी, चंद्रपूर जिल्हा जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी,चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री व महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री या सर्वाना सातत्याने पाजरेपार रीठ ते आबमक्ता व पाजरेपार गिरवला या रस्त्याला वि.आर नबंर व रस्त्याच्या मंजुरीची मागणी करत आहे.पण या मागणीकडे कोणीही लक्ष दिलेले नाही.त्यामुळे  ७ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर हिवाळी अधिवेशन येथे मुख्यमंत्री यांचे प्रधान विकास करणे यांना या रस्त्याच्या मागणीसाठी निवेदन सादर केले होते.
         या मागणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना मागणी पुर्ण करा असे निर्देश दिले होते.परंतु जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी याकडे विशेष लक्ष दिले नाही व शेतकऱ्यांनी या संबंधात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली असता त्यांनी शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने  १९ डिसेंबर २०२३ पासून पाजरेपार रीठ ते आबमक्ता व पाजरेपार गिरोला या रस्त्याला वि.आर नबंर व रस्त्याला मंजुरी देण्यात यावी भीम आर्मी संरक्षक च्या पुढाकाराने शेतकऱ्यांनी " बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर " नावाचे धरणे आंदोलन दिवसा व कडाक्याच्या थंडीत रात्री येथील शिवबंधाऱ्याजवळ सुरू केले आहे. परंतु अजूनही या मागणीकडे शासन लक्ष देत नसल्याने  शेतकरी  आक्रमक होऊन आता '' कुठले भाडखाऊ शासन दारी '' अशा घोषणा देत आज 24 डिसेंबर रोज रविवारला सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास आंदोलन स्थळी जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध करुन पुतळा जाळला , 
       शेतकऱ्यांना रस्त्याच्या मागणी करीता आंदोलन करावे लागत असेल तर " कुठलं शासन आपल्या दारी " असा प्रश्न गिरोला, आबमक्ता, येरखेडा,माकोणा, पाजरेपार रीठ, शेतकऱ्यांनी केला आहे.
       पाजरेपार रीठ ते आबमक्ता व पाजरेपार गिरोला या रस्त्याला वि.आर नबंर देऊन रस्ता मंजुरी देण्यात यावा  मागणी  करत याकडे लक्ष न दिल्यास  आंदोलन तीव्र होत जाणार असून या मागणीकडे लक्ष न दिल्यास वरुड्याचे आमदार व जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांचेही पुतळे जाण्याचा  इशारा शेतकरी व भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे अध्यक्ष जगदीश मेश्राम यांनी  दिला आहे.

Comments