*वनविभागाने रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर केले जप्त* .

**वनविभागाने रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर केले जप्त* 

वरोरा : 
शाम ठेंगडी

 वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी वनक्षेत्रातून अवैधरीत्या रेतीची वाहतूक करणाऱ्या दोघांना आज ताब्यात घेतले असून रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर ही जप्त केले आहेत.
      आज 22 डिसेंबर रोजी सकाळी साडे सातच्या सुमारास वन कर्मचारी क्षेत्र सहाय्यक एच डी खोब्रागडे,वनपाल व्ही एम ढुमणे,  वनरक्षक अमोल तिखट व रोजंदारी वनमजूर करंजी सर्वे नंबर २३९/२ मध्ये गस्त करीत असताना त्यांना ट्रॅक्टर क्रमांक एम एच 29 बी व्ही ४१३० व ट्रॅक्टर क्रमांक एमएच34 बी एफ 6527 हे अवैधरित्या रेतीचे वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. यावेळी  वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी किशोर संभाजी आत्राम राहणार करंजी व राहुल रामभाऊ जोगी राहणार शेंबळ यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांचे कडे कुठल्याही प्रकारच्या रेती वाहतुकीचे कागदपत्र आढळून आले नाही. त्यामुळे सदर ट्रॅक्टर,ट्रॉली व इतर साहित्य ताब्यात घेऊन वन कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद करून केली असून ट्रॅक्टर साहित्यासह वरोडा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात जमा केले आहेत.
 पुढील चौकशी सहाय्यक वनरक्षक घनश्याम नायगमकर यांचे मार्गदर्शनात  वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे व क्षेत्र सहाय्यक एचडी खोब्रागडे, वनरक्षक अमोल तिखट हे करीत आहे.

Comments