प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

वरोरा वासियांना खुशखबर....आज विद्यार्थ्यांसाठी आज बुगी उगी राष्ट्रीय नृत्य स्पर्धा मोफत असणारआई-वडिलांसाठी प्रत्येकी शंभर रुपये प्रवेश फी राहणार...रविवारी मेगा फिनाले थेट प्रक्षेपण बंद असणार.आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची कार्यक्रमाला सदिच्छा भेट..

वरोरा वासियांना खुशखबर....
आज विद्यार्थ्यांसाठी आज बुगी उगी राष्ट्रीय नृत्य स्पर्धा मोफत असणार

आई-वडिलांसाठी प्रत्येकी शंभर  रुपये प्रवेश फी राहणार...

रविवारी मेगा फिनाले थेट प्रक्षेपण बंद असणार.

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची कार्यक्रमाला सदिच्छा  भेट..

वरोरा
चेतन लुतडे

वरोरा येथे पंधरा तारखेपासून सुरू असलेल्या राष्ट्रीय नृत्य स्पर्धेचा आज शेवटचा दिवस असून या निमित्त वरोरा वासियांना खास सवलतीच्या दरात प्रवेश दिला जाणार आहे.
यासाठी पुरुष व महिलांना केवळ प्रत्येकी शंभर रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे या संधीचा वरोरा वासियांनी लाभ घ्यावा व भारताच्या विविध प्रांतातून आलेल्या नृत्य स्पर्धकांचा अविष्कार बघावा अशी विनंती आयोजक हॉटेल ग्रीनवे आणि बाबुलाल आईस्क्रीम यांनी केली आहे.
या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस असून थेट प्रक्षेपण बंद असणार आहे. आतापर्यंत लाईव्ह चंद्रपूर व मराठी चैनल वर  कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सुरू होते. दहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांपर्यंत सर्व मुलांना मोफत मेगा फिनाले पाहायला मिळणार आहे. 
रविवारी संध्याकाळी पाच वाजेपासून मेगा फिनाले ला सुरुवात होत आहे. भारतातील आसाम ,मुंबई, दिल्ली, हैदराबाद व इतर शहरातून स्पर्धक मोठ्या प्रमाणात वरोरा शहरात दाखल झाले आहेत. त्याचबरोबर वरोरा शहरातील स्पर्धक सुद्धा मेगा फिनाले मध्ये भाग घेणार आहेत. यामध्ये एकापेक्षा एक नृत्य स्पर्धक अलिशान मैदानात आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असणाऱ्या राष्ट्रीय नृत्य स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
आयोजकांनी मेगा फिनाले साठी तगडी सुरक्षा व्यवस्था केली असून श्रोत्यांसाठी उत्तम खाण्याची स्टॉलची व्यवस्था केली आहे. 
त्यामुळे वरोरा वाशियांसाठी आलीशान मैदानात रविवारची मेजवानी ठरणार आहे.
या स्पर्धेसाठी वरोरा भद्रावती विधानसभेचे आमदार प्रतिभाताई धानोरकर उपस्थित राहून. अशा भव्य आयोजनाबद्दल सर्व स्पर्धक व आयोजकांना शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी शहरातील पत्रकाराचा सत्कार ग्रीनवेचे मालक शुभम चिमूरकर व बाबूलाल आईस्क्रीम चे मालक निरज चौधरी यांच्याकडून करण्यात आले.


Comments