*कृषीआयुक्त यांची वरोडा-भद्रावती तालुक्याना भेट*

*कृषीआयुक्त  यांची  वरोडा-भद्रावती तालुक्याना भेट*

वरोडा: शाम ठेंगडी 
       कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोडा व भद्रावती तालुक्यातील शेतींना भेट दिली. शेतकऱ्यांशी चर्चा करून व पिकाचे अर्थशास्त्र समजून घेतले.
वरोडा तालुक्यातील कोंढाला  येथील कोरडवाहू कापूस उत्पादक शेतकरी विकास धेगळे व  बागायती कापूस उत्पादक शेतकरी भानुदास बोधाने यांच्या शेतावर भेट देवून कापूस पिकाची लागवड व अर्थशास्त्र दोन्ही बाबींवर चर्चा केली. सदर चर्चेदरम्यान सर्व साधारण शेतकरी यांच्या समस्या जाणून घेवून प्रचलित योजनेत काय बदल केले पाहिजेत याबाबत चर्चा केली.

*एकर्जुना उत्कृष्ट कापूस प्रकल्प* 
एकर्जुना संशोधन केंद्र येथे डॉ श्रीकांत अमरशेट्टीवार यांनी बिटी व नॉन बिटी कापसाच्या विविध प्रात्यक्षिकाची  माहिती दिली. सेंद्रिय कापूस लागवड तंत्रज्ञान, ट्रायकोकार्ड वापर व कामगंध सापळा वापरा याबाबत चर्चा करण्यात आली. कापसाचे उत्पादन ३०-३५% वाढीसाठी ठिबक सिंचन क्षेत्र वाढ विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहेत याबाबत मा आयुक्त यांनी सूचना दिल्या.

*कांचनी शेतकरी उत्पादक कंपनी*
कांचनी शेतकरी उत्पादक कंपनी येथील स्मार्ट प्रकल्पा अंतर्गत जिंगीन प्रेसिंग यूनिट ला भेट देण्यात आली. तेथील उपस्थित शेतकऱ्यांशी विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली

*नंदोरी शेतकरी उत्पादक कंपनी*
स्मार्ट प्रकल्पा अंतर्गत नंदोरी शेतकरी उत्पादक कंपनीच्या स्वच्छ्ता व प्रतवार युनिट ला भेट देण्यात आली व उपस्थित शेतकऱ्यांबरोबर चर्चा करण्यात आली 

*प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग*  
नंदोरी येथील सुनील उमरे यांच्या पीएमएफएमइ अंतर्गत तेल घाणी युनिटला भेट देवून संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्याचबरोबर त्यांच्या शेतावरील सेंद्रिय ऊस उत्पादन व सेंद्रिय गुळ निर्मिती केंद्राला भेट देण्यात आली

 मा आयुक्त (कृषि) डॉ प्रवीण गेडाम सर यांच्यासोबत आत्माचे संचालक दशरथ तांबाळे , नागपूर विभागीय कृषी सहसंचालक राजेंद्र साबळे,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार,  अधीक्षक कृषी अधिकारी विकृससं मिलींद शेंडे ,  पी आय यु स्मार्ट नागपूरच्या प्रज्ञा गोळघाटे,  आत्मा चंद्रपूरच्या संचालक प्रिती हिरळकर,  स्मार्ट चंद्रपूरच्या  नोडल अधिकारी नंदकुमार घोडमारे ,  उपविभागीय कृषी अधिकारी तथा तालुका कृषी अधिकारी सुशांत लव्हटे, भद्रावतीचे तालुका कृषी अधिकारी मोहिनी जाधव, गणेश मादेवार पुरवठा व मूल्य साखळी तज्ञ तथा व्यवसाय सल्लागार स्मार्ट चंद्रपूर, प्रगती चव्हाण, अरुण झाडे, विजय काळे, श्याम पाटील, अरविंद भरडे सर्व मंडळ कृषी अधिकारी, किशोर डोंगरकार, पंकज ठेंगणे, प्रफुल्ल अडकिने, पांडुरंग लोखंडे, लता दुर्गे, हर्षल ईद्दे सर्व  कृषी पर्यवेक्षक, गोविंद देशमुख,सर्जीव बोरकर, राजूरकर, निमसटकर, टिपले, चौरे, कोहळे,असटकर, विशाल घागी, सुधीर हिवसे, मीनल असेकर, प्रतीक भेंडे व शेतकरी उपस्थित होते

Comments