२६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवान आणि मृत्यूमुखी नागरिकांना श्रध्दांजली*
*२६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवान आणि मृत्यूमुखी नागरिकांना श्रध्दांजली*
२६ नोव्हेंबर २००८चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता.
या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आणि मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना, अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद, व माजीसैनिक संघटना वरोरा, यांचेकडून, शहीद स्मारक परिसर वरोरा इथे सामूहिक श्रध्दांजली देण्यात आली.
सर्व प्रथम आँननरी कॅप्टन मा. वामन निबृड आणि प्रतिष्ठीत नागरिक श्री अमन मोरेश्वर टेमूर्डे यांनी शहिद स्मारकवर पुस्पचक्र वाहून मानवंदना दिली आणि एअर व्हेटरन डी एन खापने यांच्या नेतृत्वात उपस्थित माजीसैनिक रमेश आवारी .सागर कोहळे. वसंतराव काकडे. देवराव राऊत. गजानन उपरे. सुरेश बोभाटे .ऋषी मडावी. रुपेश कुतरमारे.दौलत ढोके. प्रकाश चिकटे. गणेश धोबे.गणेश मडावी. योगेश ठेंगणे.यांनी सामुदायिकपणे श्रध्दांजली अर्पण केली.
Comments
Post a Comment