वरोडा : श्याम ठेंगडी वरोरा
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज एक नोव्हेंबर रोज बुधवार ला येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या लक्षणिक उपोषणात अनेक मराठा समाजातील पुरुष,महिला व शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी शासनाला दिलेल्या मुदतीतही आरक्षणाबद्दल शासनाने ठोस निर्णय न घेतल्याने येथील मराठा सकल मराठा समाजातर्फे जरांगे यांच्या उपोषणाच्या उपोषणाच्या समर्थनार्थ हे एक दिवसाचे लक्षणिक उपोषण करण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोडा येथील तहसील कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात शाळेमध्ये जाणारे लहान मुले सहभागी झाले होते. एक मराठा लाख मराठा ... अशा अनेक घोषणा देत सरकारला सतर्कतेचा इशारा आपल्या आंदोलनातून दिला.
येथील उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे यांनी लाक्षणिक उपोषण मंडपाला भेट दिली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या उपोषणकर्त्यांनी त्यांना दिलेले निवेदन त्यांनी स्वीकारले.
महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या जनभावनेचा योग्य आदर करीत मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे.अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन समाजातर्फे करण्यात येईल याची सर्व जबाबदारी शासनाची राहील असा इशारा या निवेदनातून घेण्यात आला.
Comments
Post a Comment