श्रमिक पत्रकार भवन चंद्रपूर येथे मा. राष्ट्रीय सचिव माजी आमदार राजेंद्र जैन साहेब यांच्या हस्ते व ग्रामीण जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ना. श्री. अजितदादा पवार साहेब, राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा.खा.श्री.प्रफुल पटेल साहेब व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.खा.श्री सुनील तटकरे साहेब यांच्या मान्यतेने श्री.विलासराव नेरकर यांच्यावर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वरोरा विधानसभा अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली.
त्यामुळे वरोरा विधानसभा क्षेत्रात कार्यकर्ते मध्ये
आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच वरोरा तालुकाध्यक्षपदी रविंद्र भोयर सरपंच ग्रामपंचायत येन्सा व वरोरा शहराध्यक्षपदी श्री चंद्रकांत कुंभारे यांची निवड करण्यात आली. भद्रावती तालुकाध्यक्षपदी श्री राजू बोरकर भद्रावती, शहराध्यक्षपदी गितेश सातपुते यांची निवड करण्यात आली. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील प्रमुख नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment