वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

खाजगी बँक फायनान्स कंपनीच्या वारंवार तगाद्यामूळे महिलेची आत्महत्या

खाजगी बँक फायनान्स कंपनीच्या वारंवार तगाद्यामूळे महिलेची आत्महत्या

वरोरा.

वरोरा  तालुक्यातील नागपूर रोडवर रामपूर जवळ असलेल्या फत्तापूर या गावातील महिला मंगला उर्फ उर्मिला गुलाब बावणे वय 42 वर्ष तिने काल 5 आक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

मंगला ही पती गुलाब बावणे यांच्यासोबत रोज मजुरीचे काम करीत होती. या महिलेला दोन मुले असून शाळेत शिक्षण घेत आहे. मृतक उर्मिलाने वंदना फायनान्स वरोरा, ग्रामीण कुट्टा, हिंगणघाट वरोरा प्युअर फायनान्स समुद्रपूर, वर्धा येथील डेली फायनान्स या अटीवर कर्ज घेतले होते. हे कर्ज दोन ते तीन महिन्यापासून थकीत झाल्याने या कंपनीचे कर्मचारी अधिकारी घरी येऊन घाण, अर्वाच्च शब्दात बोलून जात होते,
 अशी माहिती मृतक उर्मिलाच्या मोठ्या मुलाने प्रतिनिधीशी बोलताना दिली. या संपूर्ण प्रकाराला कंटाळून काल 5 सप्टेंबर रोजी विष प्राशन करून आत्महत्या केल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला.

 सदर फायनान्स कंपनी यांना रिझर्व बँकेकडून कशा पद्धतीच्या अटी शर्तीवर मान्यता देण्यात आली आहे, याची सखोल चौकशी , करणे आता गरजेचे झाले असून संबंधित विभाग तसेच पोलिस प्रशासन यासंदर्भात काय महत्त्वाची भूमिका बजावतात, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Comments