दसरा मेळाव्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून शेकडो शिवसैनिक मुंबईला रवाना

दसरा मेळाव्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून शेकडो शिवसैनिक  मुंबईला  रवाना

वरोरा
चेतन लूतडे

महाराष्ट्रात दरवर्षी शिवसेनेतर्फे दसरा मेळावा साजरा केला जातो. यावर्षी एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेचा भव्य मेळावा आझाद मैदान मुंबई येथे होत आहे.  
चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते व बंडू हजारे यांच्या नेतृत्वात २० बसेस मध्ये जवळपास 800 शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला  व युवक या प्रवासात जात आहे.
पूर्व विदर्भ संघटक किरन पांडव यांच्या नेतृत्व जिल्ह्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात हजर राहणार असून या सर्व लोकांची व्यवस्था काळजीपूर्वक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाप्रमुखांनी दिली आहे.

त्यामुळे गावागावातून शिवसैनिकांनी होणाऱ्या मुख्यमंत्र्याच्या दसरा मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात  हजरी लावणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातून असा केला जाईल प्रवास

सोमवार ला दुपारी वरोरा -चंद्रपूर  येथील 
प्रस्थान .
इथून संभाजीनगर 400 किलोमीटर अंतरावर पहिला मुक्काम असेल. या ठिकाणी शिवसैनिकाची जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

यानंतर सकाळी मंगळवार संभाजीनगर ते आझाद 
मैदान  सभास्थळी. या ठिकाणी शिवसैनिकांची पुढील व्यवस्था करण्यात आली आहे.

सभा संपल्यानंतर लगेच वापस प्रवास.
वापस येताना शेगाव येथे मुक्काम व जेवणाची व्यवस्था.

 या प्रवासामध्ये महिला, युवक, वृद्ध , मोठ्या प्रमाणात असल्याने प्रत्येक गाडीमध्ये गाडी प्रमुख दिलेला आहे. कोणतीही इमर्जन्सी असल्यास गाडी प्रमुखाला  सांगण्यात आले आहे. अशा वेळेस गाडी म्हणून राखीव करण्यात आलेली आहे आलेली आहे.

दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेचे या निमित्ताने बराच खर्च करण्यात आलेला आहे.

Comments