आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रयत्नाने एक शाळा एक गणवेश मागणी पूर्ण*

*आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रयत्नाने एक शाळा एक गणवेश मागणी पूर्ण*

चंद्रपूर : महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय व खासगी शाळांमध्ये एक शाळा एक गणवेश अशी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रयत्नाने पूर्ण झाली आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने या मागणीला मंजुरी दिली आहे. अनेकदा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यांचं प्रमाणे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन देऊन विनंती केली होती. 
आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी गेल्या काही महिन्यांपासून या मागणीसाठी पाठपुरावा केला होता.  त्यांच्या प्रयत्नांमुळे राज्य सरकारने या मागणीला मंजुरी दिली आहे.

या निर्णयामुळे महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये एकसमान गणवेश असेल. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकता आणि समरसता वाढेल, असा विश्वास आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विविध प्रकारचे गणवेश असल्याने विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव होता. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात द्वेष आणि मतभेद निर्माण होत होते. यावर उपाय म्हणून आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी एक शाळा एक गणवेशची मागणी केली होती.
-------------------------------------------------------
*आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे आभार*

या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांनी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे आभार मानले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना एकसमान गणवेश मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकता आणि समरसता वाढेल.

Comments