पत्रकारांची दखल घेऊन त्यांचा सन्मान करणे कौतुकास्पद --श्याम ठेंगडी


छावाग्रुप आणि मराठी दुर्गा उत्सव मंडळ यांच्याकडून पत्रकारांचा सत्कार

पत्रकारांची दखल घेऊन त्यांचा सन्मान करणे कौतुकास्पद 
--श्याम ठेंगडी 

वरोरा : प्रसार माध्यमे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे .परंतु या माध्यमांचे प्रतिनिधी असलेल्या पत्रकारांची व त्यांच्या कार्याची दखल फारसी घेतली जात नाही. अशा परिस्थितीत पत्रकारांना बोलवून त्यांचा सन्मान करणे हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन येथील ज्येष्ठ पत्रकार श्याम ठेंगडी यांनी छावा ग्रुप तर्फे आयोजित दांडिया उत्सव कार्यक्रमाप्रसंगी केले.

 नवरात्र उत्सवाच्या शुभ पर्वावर येथील आनंदवन चौक परिसरात छावा ग्रुप तर्फे दांडिया आणि गरबा उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमात मंगळवार दिनांक १७ ऑक्टोबर रोजी शहरातील पत्रकारांना बोलून त्यांचा सन्मान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छावा ग्रुप चे मार्गदर्शक सुधाकर कुंकुले हे होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक छावा ग्रुपचे अध्यक्ष आकाश लिगाडे यांनी केले. 

या कार्यक्रमाला तरुण भारत दैनिक वृत्तपत्राचे श्याम ठेंगडी, पुण्यनगरी चे अनिल पाटील, लाईव्ह चंद्रपूर चैतन्य लुतडे, दैनिक नवजीवन रवी खाडे, दैनिक सकाळ बालकदास मोटघरे, माढेळी दैनिक पुण्यनगरी अनील नौकरकार , स्टार महाराष्ट्र सारथी ठाकूर, सह्याद्रीचे राखणदार सुरज घुमे, नवजीवन विशाल मोरे इत्यादी पत्रकार उपस्थित होते. या सर्वांचा छावा ग्रुप तर्फे सन्मान करण्यात आला. छावा ग्रुप तर्फे आयोजित दांडिया व गरबा महोत्सवा दरम्यान १७ ऑक्टोबर रोजी उत्कृष्ट गरबा करणाऱ्या आनंदी मनोज लोहकरे या मुलीला व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेतर्फे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. 
सदर कार्यक्रमाला उपस्थितांचे आभार  छावा ग्रुपचे उपाध्यक्ष निहाल मत्ते यांनी मानले. याप्रसंगी समीर देठे , कलश गेडाम, गुड्डू गेडाम,  कपिल राऊत, माहि पवार, बादल रौतिया, विनय तेलमोरे, मयूर ,बंटी, कृष्णा हरणे, अमित नन्नावरे ,विशाल ढोक,  तेजस राऊत, गौरव पेंढारकर यांच्यासह मंडळाचे सदस्य आणि गरबा व दांडिया उत्सवात सहभागी  मुली आणि महिला तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर माढेळी नाक्यावरील मराठी दुर्गा उत्सव मंडळात   शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या वतीने मानचिन्ह देऊन पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.

 पहिल्यांदाच सामाजिक स्थळावर अशा पद्धतीचा सत्कार होणे  म्हणजे पत्रकारांचे मनोबल वाढवणे असून सर्व पत्रकारांनी अशा सामाजिक संस्था व राजकीय नेत्यांचे आभार व्यक्त केले आहे. 

Comments