मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली श्री नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांची मागणी मान्य*

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली श्री नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांची मागणी मान्य*
दि. 17/10/2023 ला रात्री  एक वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचे लुईस वाडी ठाणे येथील घरी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत व   विदर्भातील शिवसेनेच्या संघटन बांधणी संदर्भात  चर्चा करण्यात आली. यावेळी पूर्व विदर्भाचे नेते श्री किरण भाऊ पांडव यांच्या नेतृत्वात चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते  उपस्थित होते.

 चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीला पाणी देता यावे व कपाशीच्या व तूर पिकाला पाणी देता यावे व रब्बीच्या हंगामाकरिता ओलिताची व्यवस्था करता यावी, याकरिता एक महिन्याकरिता चंद्रपूर जिल्हा भार नियमन मुक्त करण्यात यावा. याचे निवेदन देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री साहेबांनी तात्काळ होकार दर्शवून कारवाईचे आदेश संबंधित विभागाला दिले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चंद्रपूर जिल्ह्याची समस्या ऐकून घेतल्या बाबत व इतक्या व्यस्त कामातही कार्यकर्त्यांच्या प्रश्नाची दखल घेतल्याबद्दल  चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त संपर्कप्रमुख श्री गंगाधर जी बडूरे, श्री नितीन मत्ते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर, वर्धा जिल्हाप्रमुख श्री राजेश जी सराफ यांनी मुख्यमंत्री चे आभार मानले आहेत.
येणाऱ्या काळात शिवसैनिकांनी समाज हिताचे काम करावे असे निर्देश करत पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह भरला. 
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये  वरोरा, चंद्रपूर ,बल्लारशा विधानसभेची जिल्हाप्रमुख म्हणून नितीन मत्ते यांच्याकडे भार सोपवला आहे. 

याप्रसंगी जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन कांदा अनुदान प्रश्नावर चर्चा केली. शासनाच्या पैशावर दरोडा घालणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला भीक घालणार नाही. अहवाल सादर होताच दोषीवर निश्चितच कारवाई करणार असे संकेत पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांना  दिले आहे.

Comments