वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

श्री नितीन मत्ते यांची शिवसेना चंद्रपूर जिल्हा प्रमुखपदी फेरनियुक्ती करण्यात आल्याने तिन्ही विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी भेटून दिल्या शुभेच्छा !*

*श्री नितीन मत्ते यांची शिवसेना चंद्रपूर जिल्हा प्रमुखपदी फेरनियुक्ती करण्यात आल्याने तिन्ही विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी भेटून दिल्या शुभेच्छा !*

वरोरा 
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे  यांचे आदेशाने व श्री किरणभाऊ पांडव पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख यांचे सूचनेनुसार तसेच संपर्कप्रमुख श्री दत्तात्रय पैईतवार साहेब यांचे उपस्थितीत शिवसेना चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा - चंद्रपूर व बल्लारशा या तिन्ही विधानसभा क्षेत्रासाठी श्री नितीन मत्ते यांची जिल्हाप्रमुख म्हणून फेरनियुक्ती करण्यात आली .

यामुळे या तिन्ही विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी श्री आशिष ठेंगणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रपूर, श्री कमलेशजी शुक्ला उप जिल्हाप्रमुख बल्लारशा विधानसभा, श्री अरविंद धिमान जिल्हाप्रमुख वैद्यकीय मदत कक्ष चंद्रपूर, श्री संतोषभाऊ पारखी शिवसेना तालुका प्रमुख चंद्रपूर, श्री सिंगलदीप पेंदाम उप -तालुका प्रमुख भद्रावती, श्री मनीष बुच्चे उप शहर प्रमुख भद्रावती, श्री जीशान शेख उपशहर प्रमुख बल्लारशा या सर्व पदाधिकारी यांनी भेटून श्री नितीनभाऊ मत्ते यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व तीनही विधानसभा क्षेत्रात शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली . यावेळी नितीनभाऊ मत्ते यांनी मोलाच्या सूचना देऊन तिन्ही विधानसभा क्षेत्रात पक्ष वाढवण्या संदर्भात विशेष सूचना केल्या

Comments