शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या वाढदिवसा- प्रित्यर्थ विविध कार्यक्रम

 शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या वाढदिवसा- प्रित्यर्थ विविध कार्यक्रम 

जेष्ठ वयोवृध्द नागरिकांचा सत्कार , गरजवंतांना मदत , अनाथ मुलांच्या भेटी, गोरगरिबांसाठी जनसंपर्क अभियान , वाचनालयाला पुस्तके वितरण* 
......................................................................
वरोरा
चेतन लूतडे

   भद्रावती स्थानिक श्री मंगल कार्यालय परिसरातील  गौरी ग्रीन लॉन येथे दि. १३ ऑक्टोंबर २०२३ रोज शुकवारला  शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तसेच राजकीय कार्यासोबत  सामाजिक सेवेत सदैव तत्पर राहणारे  रविंद्र शिंदे यांच्या वाढदिवसा- प्रित्यर्थ विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
   सर्वप्रथम  शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे  आनंदवन येथील थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या समाधीला भेट देवुन त्यांना श्रध्दांजली अर्पण करतील. त्यानंतर भद्रावती येथे विविध कार्यक्रमाला उपस्थित राहतील. याप्रसंगी समाजातील जेष्ठ वयोवृध्द नागरिकांचा  सत्कार करण्यात येईल. दिव्यांग बंधू -भगिनिंना तीन चाकी साईकील आणि गरजूंना कर्णयंत्र  वितरीत करण्यात येईल. विविध आजाराने ग्रस्त असलेल्यांना आर्थीक मदत देण्यात येईल.समाजातील इतर अडचणीत असलेल्या विविध गरजवंतांना मदत देण्यात येईल. वाचनालयाला पुस्तके देण्यात येईल. समाजातील व तळागाळातील जनतेच्या भेटी घेवून त्यांच्या सुख दुःखाची माहिती घेवून त्यांना मदत करण्यासाठी जनसंपर्क अभियान राबविण्यात येईल. शैक्षणिक कार्यासाठी दत्तक घेतलेल्या मुलामुलींच्या आणि  त्यांच्या पालकांच्या भेटीगाठी घेवून विद्यार्थांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येईल.
    या कार्यक्रमात महिला आघाडी जिल्हा प्रमुख नर्मदा बोरेकर , युवा सेना पुर्व विदर्भ विभागीय सचिव तथा  गोंडवाना विद्यापिठाचे सिनेट सदस्य प्रा. निलेश बेलखेडे,उपजिल्हा प्रमुख तथा भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती
भास्कर ताजणे, भद्रावती तालुका प्रमुख तथा न.प. भद्रावतीचे नगरसेवक   नरेंद्र पढाल, वरोरा तालुका प्रमुख तथा वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्ता बोरेकर, भद्रावती शहर प्रमुख घनश्याम आस्वले,वरोरा शहर प्रमुख खेमराज कुरेकर, वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र समन्वयक वैभव डहाणे, विधानसभा संघटक मंगेश भोयर, युवा सेनेचे अभिजित कुडे, तालुका संघटीका तथा भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती  अश्लेषा भोयर, (जिवतोडे), माजी नगराध्यक्ष  ज्ञानेश्वर डुकरे, युवती सेना जिल्हा युवती अधिकारी प्रतिभा मांडवकर, वरोरा तालुका संघटीका सरला मालोकर , युवा सेना प्रमुख राहूल मालेकर,शहर संघटीका माया टेकाम,तालुका समन्वयक भावना खोब्रागडे आणि युवती सेना उपजिल्हा अधिकारी शिव गुडमल यांच्यासह वरोरा -भद्रावती  विधानसभा क्षेत्रातील असंख्य शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित राहतील.              

सौ नर्मदा बोरेकर जिल्हा महीला आघाडी प्रमुख, कु. प्रतिभा माडंवकर जिल्हा युवतीसेना अधिकारी,
वैभव डहाने वरोरा-भद्रावती विधानसभा समन्वयक,

तालुकाप्रमुख दत्ताभाऊ बोरकर,खेमराज कुरेकार वरोरा  शहरप्रमुख राजेंद्र पुसदेकर,    
 सौ सरला ताई मालोकार वरोरा तालुका सघंटीका महीला आघाडी , 
विलास झिले उपतालुकाप्रमुख,
गजानन गोवारदिपे विभागप्रमुख,
विक्की गायकवाड उपविभागप्रमुख, 
किशोर झाडे उपविभागप्रमुख, 
ताई ननकटे उपतालुका सघंटीका, 
प्रशात भोग शाखाप्रमुख टेभुडॅा,

आधी सर्व कार्यकर्त्याकडून श्री रवींद्र भाऊ शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


Comments