वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

वरोर्यात विनापरवानगी पक्के बांधकाम; नोटीस ला जुमानले नाही, आता गुन्हा दाखल होणार

वरोर्यात विनापरवानगी पक्के बांधकाम; नोटीस ला जुमानले नाही, आता गुन्हा दाखल होणार

बातमी: चेतन लूतडे 

वरोरा, (९/४/२६) – नगरपरिषदेच्या एकापाठोपाठ एक नोटीस  देऊन सुद्धा एका व्यक्तीने प्रशासनाच्या कोणत्याही नोटीसला न जुमानता वरोरा येथील कॉलरी प्रभागात  विनापरवानगी पक्के बांधकाम केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ५३ अन्वये गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली आहे. याबाबत वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नगरपरिषदेला मिळालेल्या तक्रारीनुसार, श्री मुस्तफा युसुफ अली बोहरा यांनी राजेश लक्ष्मण हरीयाणी (वय ४६) यांच्यावर विनापरवानगी बांधकाम करत असल्याची तक्रार दि. २ सप्टेंबर २०२५ रोजी केली होती. त्यानंतर नगरपरिषदेने दि. १५ सप्टेंबर २०२५ रोजी स्थळ निरीक्षण केले असता हरीयाणी यांच्या जागेवर पक्के बांधकाम सुरू असल्याचे आढळून आले.

नगरपरिषदेने दि. ४ सप्टेंबर २०२५ रोजी बांधकाम बंद करण्याची नोटीस बजावली, परंतु त्यांनी ती धुडकावून बांधकाम सुरू ठेवले. त्यानंतर ८ व ११ सप्टेंबर रोजी पुन्हा तक्रारी आल्याने नगरपरिषदेने कलम ५४ व ५३ अन्वये अनुक्रमे १५ सप्टेंबर २०२५ व १० ऑक्टोबर २०२५ रोजी नोटीसा बजावल्या, तरीही आरोपीने बांधकाम पूर्ण केले.

शेवटी दि. २२ जानेवारी २०२६ रोजी अंतिम नोटीस देऊन अवैध बांधकाम स्वखर्चाने काढून टाकण्याचा आदेश दिला, मात्र आजतागायत तो हटविण्यात आलेला नाही. त्यामुळे सहाय्यक नगर रचनाकार ऐश्वर्या मोरेश्वर चरडे यांनी मुख्याधिकारी यांच्यामार्फत आरोपीविरुद्ध कलम ५३ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्याची विनंती केली आहे. पुढील कारवाई नगरपरिषद व वरोरा पोलीस प्रशासन करणार आहे.

.............



Comments