शिवसेनेत पक्षप्रवेश

शिवसेनेत पक्षप्रवेश 

बाठा पक्षाचे भद्रावती, चंद्रपुर न.परिषद माजी नगराध्यक्षा सौ. मिनल आत्राम, माजी नगरसेवक श्री. नाना दुर्गे व मनसे सेना चंद्रपूर जिल्हा अध्यक्षा महिला सेना व मनसेच्या विदर्भ नेत्या प्रतिमा ठाकूर यांच्यासह धडाडीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे हस्ते बाळासाहेब भवन मुंबई येथे ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत काम करण्याचा निर्णय

दि. ८ मुंबई, शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत व श्री. किरणजी पाडंव यांच्या समन्वयातून बाळासाहेब भवन, नरीमन पॉईट, मुंबई येथे आज उबाठा पक्षाचे भद्रावती, चंद्रपुर न.प. नगराध्यक्षा सौ. मिनल आत्राम, तसेच त्याचसोबत माजी नगरसेवक श्री. नाना दुर्गे, आणी मनसे सेना चंद्रपूर जिल्हा अध्यक्षा महिला सेना व मनसेच्या विदर्भ नेत्या प्रतिमा ठाकूर, मनसे जिल्हा सचिव मनिषा टोकलवार, युवराज जिवतोडे, योगेश ज्ञानेवार, सुनिता जिवतोडे, नयन जंगम, पियुष गुप्ता यांनी डॉ. नीलम गोऱ्हे, यांच्या हस्ते आज भगवा ध्वज हाती देऊन ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत काम करण्याचा निर्णय घेऊन शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात तुम्ही काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे.तो स्वागतार्ह आहे.

आगामी काळात विजयादशमी नंतर महाराष्ट्रातील शिवसेना महिला सेनेचा आढावा संपुर्ण होईल. यासर्व कामाला भविष्यामध्ये व आतासुध्दा चालना देण्यासाठी सहकार्य राहिल अशी ग्वाही देते. नव्याने या काम करणाऱ्या सर्व महिलांना पक्षात काम करण्यासाठी त्यांना भावी काळासाठी मी शुभेच्छा देते. 

महाराष्ट्रातील महिला शक्ती सर्वोत्तम करून शिवसेना महिला सेना मार्फत स्व. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे शिवशाहीचे स्वप्न पुर्ण करणे आमचा हेतू आहे असे शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. यावेळी सह-संपर्कप्रमुख चंद्रपूर श्री. बंडू हजारे, जिल्हा प्रमुख चंद्रपूर श्री. नितीन मते, युवासेना जिल्हाधिकारी चंद्रपूर सुर्या अडबाले, तालुकाप्रमुख बल्लारपूर जमील शेख, शिवसेना विभागीय कार्यालय प्रमुख नागपूर, प्रफुल्ल मानमोडे, भरत गुप्ता यांच्यासह आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

Comments