खूनाच्या आरोपीस ७ वर्षाचा सक्षम कारावास व दंड**खेमजई येथील घटना**आरोपीस आज सुनावली सजा*

* खूनाच्या आरोपीस ७ वर्षाचा सक्षम कारावास व दंड* *खेमजई येथील घटना* *आरोपीस आज सुनावली सजा*  वरोडा : ठेंगडी सर       जमिनीच्या वादातून पुतण्याने काकाचा खून केल्याच्या आरोपावरून पुतण्यास ७ वर्षाचा कारावास व वीस हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आज 22 एप्रिल रोज बुधवार ला सुनावली.          घटनेची माहिती वरोडा तालुक्यातील खेमजई येथे कवडू झित्रा दडमल वय 60 वर्ष व यशवंत भाऊराव दडमल वय ३० वर्ष राहत होते. यांच्यात काका पुतण्याचे नाते होते. त्यांचा वडिलोपार्जित जागेवरून नेहमी वाद होत होता. आरोपी हा मृतकाला नेहमी जागेवरून टोमणे मारून,तू माझ्या पत्नीकडे का पाहतोस असे म्हणत सतत धमकी देत होता.       याच कारणावरून 12 एप्रिल 2021 ला सायंकाळी 7:45 च्या सुमारास आरोपी यशवंतने मृतक कवडू हा आपल्या दोन नातवंडासह घरात असतांना त्याचे डोक्यावर लाकडी टेणप्याने वार करून जखमी केले. मृतक जमिनीवर खाली पडला असतानाही त्याच टेणप्याने त्यास मारले असता कवडू दडमल हे मरण पावले.        मृतकाची पत्नी लिलाब...

वरोरा-भद्रावती विधानसभा, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात प्रवेश*

 
वरोरा-भद्रावती विधानसभा, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात प्रवेश*
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तसेच ८०% समाजकारण व २०% राजकारण हे ब्रीद जोपासत व याच नितीला, सामाजिक कार्याला प्राथमिकता देवून चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्याचे काम शिवसेना (उबाठा) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे करीत आहे. विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने वरोरा व भद्रावती तालुक्यातील कार्यकर्ते शिवसेनेत पक्षप्रवेश करीत आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख आमदार आदित्य उध्दव ठाकरे यांच्या कार्याला प्रेरित होवुन वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र श्रीनिवासराव शिंदे यांच्या नेतृत्वात, वरोरा तालुकाप्रमुख दत्ता बोरेकर यांचे मार्गदर्शनात वरोरा तालुक्यातील धानोली येतील मंगेश दशरथ खाडे, किशोर तुळशिराम ठक, धनराज देविदास खाडे, आशिष ज्ञानेश्वर खाडे, अतुल सुरेश ठक, पंढरी सदाशिव ठक, सचिन दशरथ खाडे, शिरीव पुरूषोत्तम घाणे, विकास रामदास खाडे, गजानन रमेश खाडे, मनोज उत्तम ढोके, जितेंद्र दशरथ बोढे, अजय दशरथ बोढे, चेतन टिकाराम बोढे, दिपक पांडुरंग टोंगे, शुभम रामकृष्ण खाडे,मंगेश रमेश वागदरकर, भारत नारायण ठक, कार्तीक विजय ठक यांनी “शिवालय” वरोरा-भद्रावती विधानसभा मध्यवर्ती कार्यालय  येते शिवबंधन बांधीत पक्षप्रवेश घेतला.
पक्षप्रवेश समयी वरोरा उपशहर प्रमुख अनिल सिंग, उपशहर प्रमुख शशिकांत राम, चंदनखेडा मुधोली क्षेत्र उपतालुका प्रमुख बंडु पाटील नन्नावरे, भद्रावती उपशहर प्रमुख अरुण घुगुल, निखिल मांडवकर उपस्थितीत होते.
या प्रसंगी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) परिवारात, वरोरा-भद्रावती विधानसभाप्रमुख रविंद्र शिंदे, जिल्हा सघंटीका नर्मदा बोरेकर, उपजिल्हाप्रमुख तथा सभापती भद्रावती कृषी बाजार समिती भास्कर ताजने, वरोरा तालुका प्रमुख तथा संचालक वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती दत्ता बोरेकर, युवती सेना जिल्हा अधिकारी प्रतिभा माडंवकर, वरोरा शहर प्रमुख खेमराज कुरेकार, उपतालुका प्रमुख शेगाव-बोर्डा जि.प. गट तथा संचालक वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती अभिजीत पावडे, विभागप्रमुख शेगाव-बोर्डा जिल्हा परिषद गट चंद्रशेखर कापटे, उपविभाग प्रमुख शेगाव पंचायत समिती गट राहुल झुबाडे, शेगाव शहर प्रमुख गजानन ठाकरे आदी शिवसैनिक व पदाधिकारी यांच्याकडुन पक्षात नवप्रवेशीत शिवसैनिकांचे मनपूर्वक स्वागत करण्यात आले.

Comments