शिवसेना (ऊबाठा) शहर प्रमुखाचा वाढदिवस तिनचाकी सायकल वितरीत करून साजरा, शिवसेनेचा सामाजिक उपक्रम; वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांची उपस्थिती

शिवसेना (ऊबाठा) शहर प्रमुखाचा वाढदिवस तिनचाकी सायकल वितरीत करून साजरा

शिवसेनेचा सामाजिक उपक्रम; वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांची उपस्थिती

वरोरा :


शिवसेना (ऊबाठा) वरोरा शहर प्रमुख खेमराज कुरेकर यांचा वाढदिवस तिनचाकी सायकल वितरीत करून स्थानिक शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय शिवालय येथे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे आज (दि.८) ला साजरा करण्यात आला.  

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे नेहमीच २०% राजकारण व ८०% समाजकारण या पद्धतीने समाजोपयोगी कार्ये केली जात असुन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा ठसा तसेच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन वरोरा-भद्रावती विधानसभेचे विधानसभा प्रमुख रविंद्र श्रीनिवासराव शिंदे हे नेहमीच समाजकारण करीत असतात. समाजातील दुर्बल घटकांवर मदत पोहचवावी तसेच आपण समाजाचे काही देणे लागतो व आपण सामाजिक कार्यात आपला वाटा उचलावा, या हेतुने विधानसभा प्रमुखाचे कार्य नेहमीच सुरू असुन ते अविरत चालणारे आहे.
वरोरा शहर येथील अभ्यंकर वार्ड येथे वास्तव्यास असणारा आदित्य प्रफुल अहिरकर हा मुलगा दोन्ही पायांनी अपंग असुन त्याला घरामध्ये ये-जा करणे सुध्दा कठीण असल्याचे व त्याचे नित्यकर्म करण्यासाठी उचलुन न्यावे लागत असल्यामुळे त्यांच्या पालकामार्फत तीनचाकी सायकल मिळण्याकरीता रविंद्र शिंदे यांच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात अर्ज सादर करण्यात आला होता. सदर अर्जाची दखल घेत आणि शिवसेना शहर प्रमुख खेमराज कुरेकार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज (दि.८) ला आदित्य प्रफुल अहिरकर यास तीनचाकी सायकलचे वितरण करण्यात आले. 
       
शिवसेना शहर प्रमुख खेमराज कुरेकार यांचा वाढदिवस शिवालय येथे केक कापुन साजरा करण्यात आला व त्यांना पुढील भविष्यातील वाटचालीकरीता सर्वानी शुभेच्छा दिल्या. प्रसंगी आदित्य प्रफुल अहिरकर (वय 10 वर्षे) या अपंग मुलाला तिनचाकी सायकलचे वितरण करण्यात आले.
           
सदर कार्यक्रमाला विधानसभा प्रमुख रविंद्र श्रीनिवासराव शिंदे, शिवसेना जिल्हा संघटीका नर्मदाताई बोरेकर, वरोरा तालुका प्रमुख दत्ताभाऊ बोरेकर, शहर प्रमुख खेमराज कुरेकार, प्रतिभा मांडवकर, जिल्हा युवती अधिकारी, अश्लेषा जिवतोडे, तालुका संघटीका, भद्रावती तालुका, सरला मालेाकर, तालुका संघटीका, संजय नरोले, उपशहर प्रमुख, अनिल सिंग, उपशहर प्रमुख, तेजस्विनी चंदनखेडे, नेहा किन्नाके, अभिजीत कुडे, वर्षाताई कुरेकार, शुभांगी धवने, अपंग मुलाची आई शुभांगी अहिरकर, इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती. आदित्य अहिरकर यांची आई शुभांगी अहिरकर यांनी विधानसभा प्रमुख रविंद्र श्रीनिवासराव शिंदे यांचे आभार मानुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Comments