डिजिटल मीडिया असोसिएशनने भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना ढाब्यावर निमंत्रित केले*

*डिजिटल मीडिया असोसिएशनने भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना ढाब्यावर निमंत्रित केले*

चंद्रपूर

काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार हे टिल्लूपंप आहेत, तुम्ही त्यांना चहा पाजलात किंवा ढाब्यावर घेऊन गेलात तर बातम्या प्रसिद्ध करतात, असे सांगून पत्रकारांचा अपमान केला होता. त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यभरातील पत्रकार दुखावले असून त्यांच्यावर सर्वत्र निषेध प्रकट केला जात आहे.
या मालिकेत आज बावनकुळे यांना चंद्रपुरात ही निषेध करण्याचा निर्णय डिजिटल मीडिया संस्थेने घेतला आहे. डिजिटल मीडिया संस्थेने "या बावनकुळे धाब्यावर" या नावाने एक कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवले असून त्यांनी बावनकुळे यांना रविवार, 1 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर येथील लोहारा ढाब्यावर रात्री 8:00 वाजता सावजी भोजनासाठी आमंत्रित केले आहे. बावनकुळे साहेबांनी आम्हाला ढाब्यावर पत्रकारांना अनेकदा खाऊ घातला आणि चहाही दिला, त्यामुळे आता त्यांच्यासाठी आमच्याकडून ही रिटर्न गिफ्ट पार्टी असल्याचे संघटनेने म्हटले आहे. या निमंत्रित मेजवानीला बावनकुळे साहेब आले नाहीत तर मात्र त्यांचा तिथे निषेध करण्यात येईल. येत्या नवरात्रीच्या काळा पासून त्यांच्या जिभे मधून कोणतेही वाईट शब्द येऊ नयेत यासाठी गणेशाने त्यांना सदबुद्धी आणि वरदान द्यावे, अशी प्रार्थनाही संस्थेने केली आहे.
संस्थेच्या या बैठकीत डिजिटल मीडिया असोसिएशन चंद्रपूरचे अध्यक्ष जितेंद्र चोरडिया, जितेंद्र जोगाड, राजेश नायडू, दिनेश एकवणकर, जयपाल गेडाम यांच्यासह पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वरोरा शहरात उद्या गणपतीचे  विसर्जन

हॅलो मी कांदा बोलतो
 हॅलो कांदा बोलतो कांदा

 मला वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीने कधी खरेदी केला नाही
 मी  शेतात कधी दिसला नाही 

 माझ्या नावे शेतकरी यांना अनुदान
पण वेगळ्याच लोकांना मिळाला मान

 हॅलो मी कांदा बोलतो 
 हॅलो कांदा बोलतो कांदा

 तुमच्या खात्यात मध्ये आली रक्कम
 मला न विचारता दुसऱ्यानेच केली खाती भसम
 हॅलो मी कांदा बोलतो
 हॅलो कांदा बोलतो कांदा

 आता या कांद्याचे 
 चौकशी ने चांगलेच वांदे

 कांदा सडला
 शेतकरी आठला
 खाती गोठली
 माझ्यामुळे भले भले झाले मालामाल
 पण माझ्या नावाने जानी उचल केली
 तो मात्र बिचाऱ्या गोलमाल गोलमाल

 हॅलो मी कांदा आहे बोलतो.

किशोर डुकरे
विदर्भातील बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन झाले खराब.

पोळ्यानिमित्त घेतलेल्या बैलपोळा सजावटीच्या स्पर्धेत प्रथम पारितोषिक फ्रिज देताना किशोर टोंगे.

Comments