जामगांव खुर्द येथे शेतकऱ्याची आत्महत्या...सरकार लक्ष देणार का?

शेतकरी बांधवांनो आत्महत्या करू नका...किशोर टोंगे तुमचा लढा लढणार! 

जामगांव खुर्द येथे शेतकऱ्याची आत्महत्या...सरकार लक्ष देणार का? 

वरोरा:

वरोरा आणि भद्रावती तालुक्यात अज्ञात रोगाने सोयाबीनचे पीक समूळ नष्ट होत असून याविषयी शेतकरी सातत्याने आक्रोश करत असून सरकारने अजूनही दखल घेतली नाही. याला कंटाळून आज जामगांव खुर्द,तालुका वरोरा येथे गजानन घागी या शेतकऱ्याने शेतात गळफास लावून आत्महत्या केली आहे.

शेतकऱ्यांचा हा प्रश्न गंभीर असून तुमच्यासाठी मी हा लढा लढणार असून सरकारला मदत करण्यासाठी भाग पाडणार आहे मात्र आपण असं कुठलही टोकाचं पाऊल उचलून आपलं जीवन संपवू नये असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.

सरकारने वरोरा भद्रावती तालुक्यातील शेतकरी बांधवांची परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने मदत जाहीर करावी. यासाठी आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कृषिमंत्री यांच्याकडे शेतकऱ्यांच्या मागण्या निवेदनाद्वारे सादर केल्या आहेत. याची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करू असे किशोर टोंगे यांनी जाहीर केले.

Comments