पोलिसांना न्याय मागण्यासाठी महिलेने विष घेतल्याचा बनाव केल्याचा पोलिसांचा दावा.सीसीटीव्ही कॅमेरा मुळे हा सगळा प्रकार उघडकीस
पोलिसांना न्याय मागण्यासाठी महिलेने विष घेतल्याचा बनाव केल्याचा पोलिसांचा दावा.
सीसीटीव्ही कॅमेरा मुळे हा सगळा प्रकार उघडकीस
वरोरा ,चेतन लूतडे
वरोरा तालुक्यातील खांबाडा येथील रहिवासी अर्चना दिवाकर दिवटे वय 48 कुटुंबीयांसह सायंकाळच्या सुमारास शेतीच्या वाद संदर्भात पोलीस स्टेशन वरोरा येथे आली. पोलिसांकडे आपली कैफियत मांडत आमच्या शेतात चाफले नामक व्यक्तीने खांब लावले आहेत . व त्या ठिकाणी माझे कापसाचे पीक खराब झाल्याचे सांगितले.त्यांच्यावर कारवाई करावी याबाबत पोलिसांना विचारणार करीत होती. व कुटुंबातील व्यक्ती जीव ओतून पोलिसांना सांगत होते. याआधी तीन दिवसा अगोदर पोलिसात तक्रार नमूद केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले तरीही कारवाई का झाली नाही याची विचारणा ते करीत होते. पोलिसांनी समजावून सांगत, सिविल मॅटर , महसूल विभागाशी संबंधित असल्याने ( एनसी) तपासणीसाठी ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र महिलेचे कुटुंब हे ऐकण्यास तयारच नव्हते. त्यांना आजच न्याय हवा होता. त्यामुळे महिलेचा राग अनावर झाला आणि लगेच उठून बाथरूमच्या दिशेने जाऊ लागली आणि वापस येताना मी विष प्राशन केले असा बनाव तिने केला त्यामुळे वरोरा पोलीस स्टेशन मध्ये हाहाकार माजला. व महिलेला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दाखल करण्यात आले.
ही जागा तीन लाख पंचवीस हजार रुपयांना याच कुटुंबीयाने विकली होती.यानंतर या जागेची महसूल विभागाकडून मोजणी करून ही जागा विकत घेतलेल्या मालकाकडे सुपूर्त करण्यात आली होती त्यामुळे या मालकांनी आपले खांब या शेतामध्ये गाडले होते.
मात्र काल झालेल्या घटनेचा बोध घेत या महिलेने चक्क मोनो नावाचे विष सोबत आणून बाथरूम मध्ये जात पिशवीतून बॉटल काढून विष घेतल्याचा प्रकार महिलेने केला. यानंतर महिलेला पोलीस स्टेशनच्या परिसरात चक्कर आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला त्यामुळे पोलीस स्टेशन पुन्हा एकदा हादरले. लगेच या महिलेला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दाखल करण्यात आले.
डॉक्टरांनी तपासणीसाठी प्रयत्न सुरू करताच या महिलेने नकार दर्शविला मात्र प्रथम दर्शनी डॉक्टरांनी काळजी घेत महिलेची संपूर्ण तपासणी केली तिच्या म्हणण्यानुसार योग्य ती औषधे दिली. व चंद्रपूर येथे पुढील उपचारासाठी पाठविले.
यानंतर लगेच पत्रकार परिषद बोलून उपविभागीय पोलीस अधिकारी नोपाणी व प्रभारी पोलीस ठाणेदार रांजणकर यांनी पोलीस स्टेशन विभागातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून पत्रकारांना ती माहिती दाखविली. यावेळी महिला बाथरूम मध्ये पिशवी घेऊन गेली यानंतर बाथरूम मधून बाहेर निघताच काहीतरी फेकले. आणि पोलीस स्टेशनच्या समोर चालत येऊन चक्कर आल्याने पडल्याचे दिसून आले. डॉक्टरांनी तपासणी केली असून मेडिकल रिपोर्ट येईपर्यंत महिलेने खरंच विष प्राशन केले होते किंवा नाही हे नक्की कळेल. या संदर्भातील बॉटल पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतली असून पुढील कारवाई ते करीत आहे.
या सर्व घटनेमुळे पोलिसांचा मनस्ताप वाढला असून जनता या पद्धतीने न्याय मागणार असल्यास पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दबाव येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
किंवा महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याची कोणी प्रयत्न करीत असल्यास ते नक्की हाणून पाडले जातील अशी प्रतिक्रिया अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
जाहिरात
Comments
Post a Comment