उत्तम आरोग्यासाठी स्वच्छता बाळगणे आवश्यक - डॉक्टर सागर वझे

प्रत्येक विद्यार्थ्यात गुणवत्ता असते ती शिक्षणातून घडवून आणली पाहिजे - डॉक्टर सागर वझे 

सूमठाणा येथील शाळेत लाऊड स्पीकर भेट

वरोरा : ग्रामीण भागात विशेष करून स्वच्छतेचा अभाव दिसून येतो. परंतु उत्तम आरोग्यासाठी वैयक्तिक व सामाजिक स्वच्छता ठेवणे अतिशय महत्त्वाचे असल्याने त्याचे पालन विद्यार्थी- विद्यार्थिनी करावे असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा रोटरीचे तालुका अध्यक्ष डॉ. सागर वझे यांनी केले.
डॉ. सागर वझे यांनी त्यांचे वडील स्वर्गीय विनायकराव वझे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ २५ साऊंड सिस्टम भेट स्वरूपात देण्याचा मानस केला आहे. यात प्रार्थना स्थळे, मंदिर आणि शाळांचा समावेश आहे. सर्वोदय विद्यालय सुमठाणा येथे आज शनिवार दि.११ऑगस्ट रोजी साऊंड सिस्टम भेट स्वरूपात देण्यासाठी ते आले होते. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस एम गौरकर हे होते.दरम्यान सर्वोदय विद्यालयातील कार्यक्रमात पुढे बोलताना डॉक्टर सागर वझे यांनी स्वतः मराठी शाळेत शिकून डॉक्टर झाल्याचे सांगून मुलांना आपण मराठी शाळेत शिकतो म्हणून प्रगती करू शकणार नाही असा न्यूनगंड बाळगू नका असे सांगितले. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असते व ती तुम्ही अभ्यासातून सिद्ध केली पाहिजे असे ते म्हणाले.सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून  जेष्ठ शिक्षक ई.दा. बोढाले व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी मुख्याध्यापक एस. एम. गौरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात डॉक्टर सागर वझे यांनी त्यांचे वडील स्व. डॉ. विनायकराव वझे यांच्या स्मृती प्रित्यर्थ डॉ. विनायकराव वझे मेमोरियल ट्रस्ट तर्फे शाळेला साऊंड सिस्टम भेट दिला. 

 याप्रसंगी सर्वोदय विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक एस.एम गौरकर यांनी डॉ सागर वझे  यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अनिल पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन एस यु गोखरे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार संदीप खिरटकर यांनी मानले. सर्वोदय विद्यालयाचे एम डी वनकर, अमोल दातारकर,एम व्ही काळे, संजय पारोधे, पंढरी तळवेकर, अशोक जोगी, लक्ष्मण हरणे ,हिरामण भगत व इतर कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात 

Comments