येत्या 25 तारखेला जवळच्या टॉकीजमध्ये सुभेदार प्रदर्शित होणार.

राज वारसा प्रोडक्शन निर्मित मराठी चित्रपट सुभेदार दिनांक २५ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. त्याचे औचित्य साधून २० ऑगस्ट रोजी ही निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. वरोरा येथील उद्योजक अनिल नारायणराव वरखडे हे या चित्रपटाचे निर्माते आहे. येथील हिरालाल लोया विद्यालयाच्या सभागृहात या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
               वीर सुभेदार तान्हाजी मालुसरे आणि सिंहगड युद्ध या विषयावर आयोजित निबंध स्पर्धा २० ऑगस्ट रोजी शिवशंभो बहुउद्देशिय सामाजिक संस्था वरोरा, शंभूराजे मर्दानी खेळ मंच, पुणे आणि विवेकानंद फाऊंडेशन वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असल्याने या स्पर्धेत विद्यालय आणि महाविद्यालयातील ९५ स्पर्धक सहभागी झाले होते. निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या विषयावर लिहताना मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. या स्पर्धेतील विजेत्यांना शिवचरित्र ग्रंथ आणि सुभेदार चित्रपटाचे ४ तिकीट व सर्व सहभागी स्पर्धकांना ' सुभेदार ' चित्रपटाचे एक टिकीट आणि प्रमाणपत्र देण्यात येईल अशी घोषणा 'सुभेदार' चित्रपटाचे निर्माते अनिल नारायण वरखडे यांनी केली.  तसेच स्पर्धेचा निकाल हा २५ आँगष्टला ' सुभेदार' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशी सोशल मिडीयावर जाहीर करण्यात येणार आहे.

इतिहासातील हा चित्रपट मराठी भाषेत असून शिवाजी महाराज यांचा इतिहासाची पुनरावृत्ती करण्यात आली आहे. या चित्रपटात  थ्रिलर ॲक्शन, गाणे सुंदर चित्रीकरण केले असून मराठी चित्रपट सृष्टीत इतिहास घडवेल असा चित्रपट निर्मात्यांनी तयार केला आहे.
त्यामुळे  येत्या 25 तारखेला जवळच्या टॉकीजमध्ये सुभेदार प्रदर्शित होत आहे तो पाहण्यासाठी विद्यार्थी युवक ,महिला  उत्सुक आहे.



Comments